शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

सुकन्या समृध्दी योजनेला वाढती पसंती

By admin | Updated: March 29, 2015 00:28 IST

भारतीय डाक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेची ४ हजार ५०० मुलींच्या पालकांनी आतापर्यंत खाती उघडली आहेत.

अमरावती : भारतीय डाक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेची ४ हजार ५०० मुलींच्या पालकांनी आतापर्यंत खाती उघडली आहेत. या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेल्या ठेवीवर ९.१ टक्के व्याजदर मिळणार आहे. पालकांनी आपल्या मुलींच्या नावे समृद्धी योजनेचे खाते उघडावे, असे आवाहन डाक सेवा विभागाने केले आहे. मुलगी जन्माला आली म्हणजे पालकांना ती ओझे वाटायला लागते. मात्र तिच्या भवितव्यासाठी पालकांनी व्यवस्थित गुंतवणूक केली तर मुलींच्या जन्माचा आनंद कमी होणार नाही. त्यामुळे ही योजना भारतीय डाक विभागाने ३ डिसेंबर २०१४ रोजी अमलात आणली आहे. यात २ डिसेंबर २०१३ या दिवशी किंवा या तारखेनंतर जन्मलेल्या मुलींकरिता आई-वडील किंवा कायदेशीर पालकांनी ही खाती पोस्टात उघडायची आहे. दरमहा या खात्यात कमीत कमी एक हजार व जास्तीत जास्त एक लाख ५० हजार इतकी गुंतवणूक करता येणार आहे. खाते उघडल्यानंतर १४ वर्षांपर्यंत यात भरणा करता येते. या योजनेची पूर्ण रक्कम २१ वर्षांनंतर व्याजासह मिळेल. मात्र मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मागील वर्षापर्यंत जमा असलेल्या एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम पालकांना काढता येणार आहे. या योजनेंतर्गत गुंतविलेल्या रकमेवर ९.१ टक्के व्याज दिले जाणार आहे. ही योजना गोरगरिबांकरिता अत्यंत फायद्याची असून मुलींच्या लग्नावेळी उपयोगी पडणारी आहे. त्यामुळे ही संकल्पना अनेकांना आवडली आहे. अनेकांनी खाती उघडली आहेत.मुलगी जन्माला आली म्हणजे पालकांना होणारे टेंशन या योजनेमुळे कमी होणार आहे. या योजनेत दरमहा एक हजार रुपये गुंतवल्यास मुलीच्या भविष्यासाठी निश्चितच चांगली गुंतवणूक करता येईल. - डी. आर. गजभिये,प्रवर अधीक्षक, डाकघर, अमरावती विभाग.