शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जन्मदात्यांच्या आत्महत्येत वाढ धक्कादायक :

By admin | Updated: June 15, 2015 00:15 IST

ज्या मुलांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले़, त्या मुलाने विवाह झाल्यानंतर मारले, तर सुनेने घराबाहेर काढले़ वृध्द माता-पित्यांना या वृध्दापकाळात खऱ्या अर्थाने एकमेकांची गरज असते.

एका वर्षात १० आत्महत्यामोहन राऊत अमरावतीज्या मुलांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले़, त्या मुलाने विवाह झाल्यानंतर मारले, तर सुनेने घराबाहेर काढले़ वृध्द माता-पित्यांना या वृध्दापकाळात खऱ्या अर्थाने एकमेकांची गरज असते. त्याच वयात दोन मुलांमध्ये पुढच्या पिढीला सांभाळण्यासाठी त्यांची विभागणी झाल्यामुळे कौटुंबिक कलहामुळे मागील एक वर्षात जिल्ह्यात १० वृध्द पित्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ पारंपरिक संयुक्त कुटुंबव्यवस्था जाऊन विभक्त कुटुंब पध्दती आली़ मी माझी पत्नी आणि माझे मुलं अशी संकुचित व स्वतंत्र कुटुंबाची व्याख्या झाल्याने घरातील वृध्द माता-पित्यांना आपुलकीेचे कौटुंबिक स्थान राहिले नाही़ वृध्द मातापित्यांना ज्या वयात आधाराची गरज असते त्या वयात माता-पित्यांना केवळ एक अडगळीची वस्तू समजून बाहेर काढले जाते़ जिल्ह्यातील मोठ्या शहरातच नव्हेतर ग्रामीण भागातील वृध्द जन्मदाते एकाकी जीवन मुलांच्या परकेपणाच्या भावनेमुळे जगत आहे़ घरात वृध्दांचा वाढलेला चिडचिडपणा, अनेक आजार झाल्याने अशा क्षुल्लक कारणावरून जन्मदात्यांना वेगळे काढण्याचे प्रकार वाढले आहे़ वृध्दपकाळामध्ये मधुमेह, रक्तदाब, दमा, पोटाचे विकार, हालचालींना मर्यादा, स्मृतीभ्रंश असे आजार प्राधान्याने होतात़ आज जे मुले तरूण आहेत. उद्या त्यांना या वृध्दपकाळाला सामोरे जावे लागणार आहे़ परंतु या बाबीचा विचार न करता सामाजिक भावनेचा वापर करणेही विसरले असल्यामुळे जन्मदात्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे चित्र आहे़वृध्दापकाळात हवाय आधारशहरातील मुले मुंबई, पुणेसारख्या शहरात कंपनीत नोकरीला आहे़ वर्षाकाठी केवळ दोन दिवसांसाठी जन्मदात्यांच्या भेटीकरिता येतात. कधी महिन्याकाठी तर कधी तीन महिन्यांतून मनिआॅर्डर येत असल्याची प्रतिक्रिया धामणगाव शहरातील ७५ व्या वयात असलेल्या वृध्द जन्मदात्यांनी व्यक्त केली आहे़ लहानपणापासून सर्वकाही सुविधा पुरवून उच्च स्तराचे शिक्षण दिले़ परंतु वृध्दापकाळात ज्यांचा आधार गरजेचा आहे़ तो मिळत नाही, अशी भावनाही या माता-पित्यांनी व्यक्त केली़ नैतिकतेचे भान येणार कधी ?नैतिकतेचे भान विसरलेली ही तरूण पिढी पाहून थेट सरकारच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावून आले. केंद्र शासनाने वृध्दांसाठी कायदे करण्यास सन २००५ मध्ये प्रारंभ झाला. यावर्षी शासनाने डेस्टिट्यूट अ‍ॅन्ड निडी सिनीयर सिटीजन केअर अ‍ॅन्ड वेलफेअर हे विधेयक तयार केले तर सन २००७ मध्ये अ‍ॅबेडन्ड अ‍ॅन्ड निग्लेक्टेड विडोज अ‍ॅन्ड ओल्ड विमेन वेलफेअर या विधेयकांची रचना केली़ वृध्दांना दिलासा व सरंक्षण मिळण्याच्या दृष्टीने हे दोन्ही विधेयक मंजूर झाले़ मात्र या कायद्याचा पाहिजे त्याप्रमाणात प्रचार-प्रसार होत नसल्यामुळे वृध्द माता-पित्यांना वृध्दाश्रमाचा मार्ग निवडावा लागत आहे़ शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यामातून पुढाकार घेऊन या वृध्दांच्या घरोघरी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय योजना देणारी सेवा सुरू करण्याची गरज आहे़ विशेषत: मुले नसतील तर रक्ताच्या नातेवाईकांनी वृध्दांचे पालन करावे.