शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांच्या कर्मभूमीत व्यसनाधिनतेत वाढ

By admin | Updated: March 19, 2016 00:17 IST

तालुक्याला संत गाडगेबाबांचा पदस्पर्श लाभला आहे. गाडगेबाबांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रध्दा, दारू, जुगार व्यसनाधिनता यावर कीर्तनातून प्रहार केलेत.

गुटख्याची सर्रास विक्री : अवैध धंदेधारकांची हिंमत वाढलीअचलपूर : तालुक्याला संत गाडगेबाबांचा पदस्पर्श लाभला आहे. गाडगेबाबांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रध्दा, दारू, जुगार व्यसनाधिनता यावर कीर्तनातून प्रहार केलेत. अशा या कर्मयोगी संताच्या पवित्र भूमित व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अचलपुरात गाडगेबाबांचे कीर्तन झाले होते. त्यांच्या नावाने स्वयंसेवी संस्था चालविल्या जातात. असे असतानाही काही समाजकंटकांनी तालुक्यात अवैध धंदे उघडले आहेत. त्याचा परिणाम समाजातील विविध घटकांवर होत आहे. अचलपूर तालुक्याची सीमा मध्य प्रदेशाला लागून असल्यामुळे सीमावर्ती भागातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात विदेशी दारू, गुटखा, पान मसाल्याची तस्करी होत आहे. महाराष्ट्रात गुटखा, पान मसाल्यावर बंदी असतानासुध्दा तालुक्यात पानटपरी, किराणा दुकानांमध्ये गुटखा मसाल्याची सर्रास विक्री सुरू आहे. शहरालगत असलेल्या काही ढाब्यांवर परवानाशिवाय दारुविक्री बिनदिक्कतपणे होत आहे. अवैध दारूविक्रीला तर सणांच्या दिवशी उधाणच येते. सणासुदीच्या दिवसांत ढाबा मालकाची चांदी असते. याकडे पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचा आरोेप जनता करीत आहे.राजरोसपणे गुटखा व पान मसाल्यांची विक्री होत असताना अन्न व औषधी प्रशासन विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. तालुक्यात देशी दारुची परवानाधारक दुकाने आहेत. शासनाच्या नियमानुसार सकाळी १० ते रात्री १० पर्यंत ती उघडी ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, दारुविक्रेते सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास दारुची विक्री करीत आहेत. त्यामुळे सकाळपासून मद्यपींची गर्दी अचलपूर-परतवाड्यातील चौका-चौकांत बघायला मिळत आहे. धंदावाढीसाठी व अधिक पैसा कमविण्यासाठी मध्यस्थांच्या माध्यमातून दारुच्यापेट्या गावोगावी पोहोचविल्या जातात. येथील ग्रामीण भागात चिल्लर दारू विक्रेत्यांचे मोठे नेटवर्क आहे. हल्ली तालुक्यातल लहान गावातही दारू मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे व्यवसनानिधतेचे प्रमाण वाढले आहे. यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)