शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

सपन, पूर्णा चंद्रभागा, शहानूर, चारघडच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:16 IST

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, चारघड नदी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. सपन नदी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पहिला व चौथा दरवाजा सायंकाळी सहाच्या सुमारास पाच सेमीने उघडला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सावध केले आहे.

ठळक मुद्देबिच्छन, पिली, पूर्णा नदीला पूर; सपनचे दोन दरवाजे उघडले

परतवाडा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, चारघड नदी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. सपन नदी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पहिला व चौथा दरवाजा सायंकाळी सहाच्या सुमारास पाच सेमीने उघडला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सावध केले आहे.सपन नदी प्रकल्पाची पाणीपातळी सकाळी ९ वाजता पाण्याची पातळी ५०८.७० मीटरवर पोहोचली होती. सायंकाळी त्यातून विसर्ग करण्यात आला. या अनुषंगाने अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना माहिती देण्यात आली तसेच लोकांना इशारा देण्यात आला. त्यापूर्वी नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे साहित्य उचलल्यानंतर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात यावेत, अशा सूचना उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिल्या होत्या.अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरण ४७ टक्के भरले आहे. धरणावर ९३ मिमी पावसाची नोंद आहे. शहरानूर धरण ४० टक्के भरले आहे. धरणावर ५० मिमी पावसाची नोंद आहे.दरम्यान, रविवारी मध्यरात्रीनंतर परतवाडा-अचलपूर शहरांतून वाहणाऱ्या बिच्छन नदीला पूर आला. अमरावती रोडवरील भूगाव लगतच्या पिली नदी आणि आसेगाव लगतच्या पूर्णा नदीलाही पूर गेला. पुरामुळे बिच्छन, पिली, पूर्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.बिच्छन नदीच्या पुरामुळे अचलपूर शहरातील भैरवघाट स्मशानभूमीत पाणी घुसले, तर पावसाच्या पाण्यामुळे परतवाडातून अचलपूर शहराकडे जाणाºया दोन्ही रस्त्यांवर तीन फूटांहूनही अधिक पाणी साचले. तहसीलमागून खिडकी गेटकडे जाणाºया रस्त्यावरील पेट्रोल पंपसमोर आणि तहसीलसमोरून दुल्हागेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर चेडे ते जि.प. हायस्कूललगत हे पाणी थांबले. यात अचलपूर शहराकडे जाणारे रस्ते बंद पडलेत. वाहतूक थांबली असून, आॅटोअभावी विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.परतवाडा शहरातील घामोडिया प्लॉट स्थित विनोद इंगोले यांच्या घरात व फर्निचरच्या दुकानातही पाणी घुसले. अमरावती रोडवरील फातिमा कॉन्व्हेंटसमोरील स्वयंवर लॉनकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या खुल्या जागेतील झोपड्यांमध्ये पाणी घुसले.अंजनगाव रोडवरील सावळी गावातील ६० ते ७० घरांमध्ये मध्यरात्रीनंतर ३ वाजताच्या सुमारास पाणी शिरले. या पाण्यामुळे व रस्त्याच्या कामामुळे अंजनगाव रस्ता बंद पडला आहे. परतवाड्यावरून अंजनगावकडे जाणारी वाहतूक थांबली आहे. धारणी रोडवरील गौरखेडा कुंभीतील काही घरांमध्ये पाणी घुसले आहे.