शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जुळ्या शहरात मनोरुग्णांमध्ये वाढ

By admin | Updated: October 9, 2014 22:55 IST

अचानक झालेले कौटुंबिक तथा सामाजिक आघात, अति मानसिक ताण, काही वेळा परंपरेने चालत आलेली आनुवंशिकता तर कधी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने समाजाकडून मिळणारी वागणूक

सुनील देशपांडे - अचलपूरअचानक झालेले कौटुंबिक तथा सामाजिक आघात, अति मानसिक ताण, काही वेळा परंपरेने चालत आलेली आनुवंशिकता तर कधी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने समाजाकडून मिळणारी वागणूक अशा विविध कारणांमुळे अचलपूर-परतवाड्यात मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. काही बाहेरगावहून आलेल्या मनोरुग्णांमुळे त्यात भर पडली आहे.समाजातील काही लोक त्यांना चिडवून स्वत:ची करमणूूक करताना दिसतात. काही मनोरुग्णांमुळे मात्र डोकेदुखी वाढली आहे. तर काही जणांकडे अंधश्रध्देतून दुर्लक्ष केले जात आहे. जुळ्या शहरात परतवाड्यातील बसस्थानक मार्ग, गुजरी, आठवडी बाजार, मिल कॉलनी स्टॉप, टिळक चौक, जयस्तंभ मार्ग तर अचलपुरात चावलमंडी, उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर, गांधी पूल, बुध्देखॉ चौक येथे हे मनोरुग्ण दृष्टीस पडतात. काही मनोरुग्णांचा मात्र चांगलाच ताप नागरिकांना सहन करावा लागतो. उपजिल्हा रुग्णालय परिसरात भटकंती करणारा एक मनोरुग्ण गप्पांमध्ये दंग असलेल्या व्यक्तीला जोरदार थप्पड लगावतो तर दुसरा मनोरुग्ण संतुलन बिघडल्यास रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे हेडलाईट लाठी घेऊन फोडतो. हा कधी-कधी दिसून येतो तर परतवाडा बसस्थानक मार्गावर एक बसलेली महिला सारखी जोरजोरात हलत पैसे मागते. मिल राज्य महामार्गावर असलेला एक मनोरुग्ण चहावाल्याच्या कॅन्टीनजवळ दहा रुपयांची नोट जमिनीवर टाकतो मग कॅन्टीनवाले ती नोट उचलून त्याच्या कपात चहा टाकतात तो एकाच घोटात तो चहा संपवून टाकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे मनोरुग्ण शहरात दिसत आहेत. बाहेरगावहून काही मनोरुग्ण शहरात येत आहेत. त्यामुळे मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मनोरुग्णांमध्ये काही प्रेमभंग झालेले, अति अभ्यासाचा ताण वाढलेले आहेत तसेच मनोरुग्णांमध्ये उच्च व अर्धशिक्षित महिला पुरुष आहेत. काही मनोरुग्ण स्थानिक तर काहींची शुध्द हरपली असल्याने नाव, गावाची माहिती नसते; तथापि महिला मनोरुग्णांना स्वत:चे देहभान नसल्याने समाजकंटक त्यांच्या अब्रूचा गैरफायदा घेतात. काही मनोरुग्ण नग्नावस्थेत फिरताना दिसतात.