शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

शहरातील हवेच्या गुणवत्तेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, दिवसाची संचारबंदी याशिवाय पर्यावरणासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरतील हवेच्या गुणवत्तेत गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा झालेली आहे. ...

अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, दिवसाची संचारबंदी याशिवाय पर्यावरणासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरतील हवेच्या गुणवत्तेत गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा झालेली आहे. महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन अधिकाऱ्यांनी हा अहवाल मंगळवारी सादर केला.

महापालिकेचा येथील शिवाजी सायन्स कॉलेजसोबत सामंजस्य करार झालेला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारा तपासणी अहवालातही हवेच्या गुणवत्तेत सुधार झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, ध्वनी प्रदूषणात सुधार नसल्याचे सभागृहाने चिंतादेखील व्यक्त केलेली आहे. हवेच्या गुणवत्तेबाबत प्राप्त माहितीनुसार, रहिवासी क्षेत्रात एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १२.४५ व १०.९८ आहे. हे प्रदूषण पातळी ८० पेक्षा कमी आहे. याशिवाय आरएसपीएमचे प्रमाण सरासरी ४८.६१ म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी आहे. सन २०१९-२९० मध्ये हे प्रमाण ६९.६४ एवढे होते.

औद्योगिक एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १३.६९ व १२.२८ एवढे आहे. आरएसपीएमचे प्रमाण ५३.४९ पेक्षा कमी आढळले आहे. गतवर्षी हे प्रमाण ८५.८३ होते. त्यामुळे यंदा घट झाल्याचे दिसून येते. शिवाय व्यापारी क्षेत्रात एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १५.३ व १३.८० आढळले हे अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी आहे. आरएसपीएमचे प्रमाणही अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी ५६.८१ आढळून आले आहे. गतवर्षी हे प्रमाण ८३.३० एवढे आढळून आले होते.

बॉक्स

पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे आरएसपीएम वाढणार

गतवर्षीच्या तुलनेत रहिवासी, ऑद्यगिक व व्यापारी क्षेत्रातील एनओएक्स, एसओटूच्या प्रमाणात घट आलेली आहे. मात्र, यात अधिक प्रयत्नांची गरज आहे. याशिवाय शहरात पायाभूत सुविधांच्या कामामुळे आरएसपीएमच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांचा विचार करता या प्रमाणात सातत्याने कमी येत आहे.

बॉक्स

वाढते ध्वनीप्रदूषण चिंतेचा विषय

दिवसेंदिवस वाढते नागरिकरण, वाहनांची संख्यावाढ, डीजे संस्कृतीचे वाढते प्रमाण यामुळे शहरातील ध्वनीप्रदूषणात झालेली वाढ चिंताजनक आहे. यामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. यासाठी शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालय या सभोवतीच्या १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे.