शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या कृषी सिंचन क्षमतेत पडणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच प्राप्त होत आहे. यासंर्दभात महिला ...

अमरावती : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच प्राप्त होत आहे. यासंर्दभात महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे हे प्रकल्प लवकरच कार्यान्वित होऊन जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत भर पडणार व पर्यायाने कृषी उत्पादकता वाढणार असल्याची माहिती ना. यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता वेळेत प्राप्त होण्याबाबत निवेदन केले. त्याचप्रमाणे, पालकमंत्र्यांनी त्याबाबत जलसंपदा मंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटूनही चर्चा केली. आमदार बळवंतराव वानखडे यावेळी उपस्थित होते. या सर्व मान्यता वेळेत प्राप्त होतील व सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली जाईल, असे ना. पाटील यांनी आश्वासित केले आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील पूर्ण झालेले सिंचन प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बॉक्स

या प्रकल्पाची प्रलंबित कामे लागणार मार्गी

जिल्ह्यातील पाथरगाव, चंद्रभागा, गुरुकुंज उपसा सिंचन, लोअर वर्धा, बोर नदी प्रकल्प, चांदस वाठोडा , चारघड, गडगा मध्यम प्रकल्प, पंढरी मध्यम प्रकल्प आदी विविध प्रकल्पांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत येणाऱ्या १८ प्रकल्पांचे कामही वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त होणार असल्याने कामे मार्गी लागतील. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याने ना.ठाकूर यांनी सांगितले.