शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रतिकारशक्तीचा शरीरावर हल्ला; हात-पाय वाकतात, हा कसला वात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:51 IST

Amravati : आजारात सिस्टेमिक ल्युपस एरिथेमोटसचे प्रमाण चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या अवयवांवर हल्ला चढवितात, तेव्हा ल्युपस विकाराची लागण होते. यालाच एसएलई असे वैद्यकीय भाषेत संबोधले जाते. हा एक वातरोग असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त आढळतो. दहा रुग्णांपैकी नऊ रुग्ण महिला असतात. प्रजननक्षम महिलांसह लहान वयातील मुलींमध्ये ल्युपस विकार आढळतो. चेहऱ्यावर फुलपाखराच्या आकाराचे लाल चट्टे येणे सुरू होते, हे या विकाराचे प्रमुख लक्षण आहे.

ल्युपस या वातरोगाबाबत आजही पाहिजे त्या प्रमाणात समाजात जागृती नाही. या विकाराची लक्षणे ही सर्वसामान्यांप्रमाणेच असल्याने अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. ल्युपस या विकाराचे एक लाख व्यक्तींमध्ये ३ ते ४ रुग्ण आढळतात. या विकारात एकाचवेळी शरीरातील अन्य अवयवांवर हल्ला होत असतो. ल्युपस विकारामुळे महिलांमध्ये गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होते.

ल्युपसची कोणतीही दोन प्रकरणे अगदी सारखी नसतात. चिन्हे आणि लक्षणे अचानक येऊ शकतात किंवा हळूहळू विकसित होऊ शकतात. काही लोक ल्युपस विकसित होण्याच्या प्रवृत्तीसह जन्माला येतात, जो संसर्ग, विशिष्ट औषधे वा अगदी सूर्यप्रकाशामुळे देखील होऊ शकतो. ल्युपसवर इलाज नसला तरी उपचारांमुळे लक्षणे नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. 

आपल्याच सैन्याचा आपल्यावर वारआजारापासून दूर ठेवण्यास रोगप्रतिकारशक्ती फायदेशीर ठरते. एसएलईमध्ये रोगप्रतिकारक पांढऱ्या पेशीच परिणाम करतात.

पांढऱ्या पेशी म्हणजे शरीरातील सैन्यरक्तातील पांढऱ्या पेशी रोगप्रतिकारक शक्तीचे काम करतात. त्यामुळे पांढऱ्या पेशीला शरीरातील सैन्य असे संबोधल्या जात असते. त्या महत्त्वाच्या असतात.

हात-पाय वाकतात आणि अंगाला येतो तापएसएलईमध्ये अनेकांची लक्षणे वेगवेगळी असतात. कुणाला ताप, सांधेदुखी, सूज, हात-पाय वाकण्याचेही रुग्ण दिसून येतात. त्यामुळे लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे

युरिक अॅसिड वाढते, तसेच प्लेटलेटस घटायला लागतेएसएलईमध्ये युरिक अॅसिड वाढत असते. पांढऱ्या पेशीवर परिणाम होत असल्याने प्लेटलेटस घटत असतात. शरीरातील प्लेटलेटस घटत गेल्याने रुग्णाची प्रकृती खालावत जाते. तसेच, वाताचा त्रासही आणखीच जाणवायला लागतो. म्हणून, वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.

प्रतिकारशक्ती कमी झाली, तर बळावतोय आजारआपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली, तर एसएलई आजाराचा धोका अधिकच वाढत जातो. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे.

'एसएलई' कशामुळे ?शरीराच्या आत आणि बाहेरील घटकांच्या संयोजनामुळे ल्युपस विकसित होतो. यामध्ये हार्मोन्स, अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा समावेश होतो.

"ल्युपस हा एक वातरोग आहे. अनुवंशिकता, अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी इतर अवयवांवर परिणाम करत असतात. परंतु, वेळीच उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो."-  डॉ. दिनेश खरात, अस्थिरोगतज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्यLifestyleलाइफस्टाइलAmravatiअमरावती