शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक मानवी व्यापाराला पायबंद घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:18 IST

फोटो : १६एएमपीएच०१ कॉमन अमरावती : राज्यात होत असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक ...

फोटो : १६एएमपीएच०१

कॉमन

अमरावती : राज्यात होत असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक उपाययोजना करणार असून, या संदर्भातील पीडितांना न्याय देण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

गुरुवारी या समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. राज्यात गैरमार्गाने होत असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या समितीने घेतला आहे. राज्यात परराज्यातून अनैतिक मार्गाने मानवी व्यापार सुरू होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यानिमित्ताने प्रत्येक राज्याशी समन्वय साधून अशा पद्धतीने व्यापार झालेल्या महिलांना त्यांच्या राज्यात परत सन्मानाने पाठवण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला. तसेच परराज्यातील अनैतिक मानवी व्यापाराद्वारे राज्यात आलेल्या अल्पवयीन मुलींना राज्याच्या मनोधैर्य योजनेमार्फत मदत देता येईल का, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

////////

बॉक्स

विशेष न्यायालय स्थापनेसंदर्भात मंथन

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक सेलमधील पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन संबंधित महिलांशी कशाप्रकारे वर्तन करावे, याबाबतचे योग्य प्रबोधन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा कलम २२ प्रमाणे विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त प्रधान सचिव गृहविभाग राज्याचे पोलीस महासंचालक तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.