शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांना तत्काळ अटक करा

By admin | Updated: August 20, 2016 00:02 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील आश्रमशाळेतील ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाला.

तिवसा : धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील आश्रमशाळेतील ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. या घटनेला प्रामुख्याने जबाबदार असलेले आश्रमशाळेचे संचालक शंकर महाराजांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा विचारमंच व विविध संघटनांद्वारे तहसील कार्यालयावर शुक्रवारी विशाल मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांचा जीव जादू-टोण्यासाठी घेणाऱ्या या आश्रमशाळेत विद्यार्थी अजिबात सुरक्षित नाहीत. त्यामुळे या आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणीदेखील निवेदनातून करण्यात आली. या प्रकारासाठी जबाबदार असलेले आश्रमशाळेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांवरही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या आश्रमशाळेला व संस्थानला देणगी देणारे लब्धप्रतिष्ठित व राजकारणी आहेत. त्यांनी संस्थेला दिलेल्या संपत्तीची चौकशी व्हावी. हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा बहुजन समाज एकत्रित येऊन आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. येथील आंबेडकर भवनापासून मोर्चाला सुरूवात झाली. दुपारी ३ वाजता मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला. यावेळी महादेव गारपवार, दिलीप वानखडे, संजय देशमुख, राज माहोरे आदींनी मोर्चाला संबोधित केले. या मोर्चाला विदर्भ लहुजी सेना, मातंग समाज संघटना, तिवसा तालुका शाखा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, लढा संघटना, अण्णाभाऊ साठे संघटना आदींनी पाठिंबा दिला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार राम लंके यांना देण्यात आले. यावेळी देवीदास गायकवाड, भूषण यावले, अशोक गवळी, सूरज डहाट, आशिष ढोले, सतीश पारधी, संभाजी ब्रिगेडचे शेतू देशमुख, नीलेश खडसे, नामदेव तांबे, प्रदीप वाघमारे, रमेश बोके, शरद काळे, नारायण प्रधान आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)सगणे कुटुंबीयांना संरक्षण द्याप्रथमेश सगणे व त्याच्या कुुटुंबियांना संस्थाचालक, आश्रमशाळेचे पदाधिकारी आदींपासून धोका आहे. त्यामुळे सगणे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या संस्थेत नरबळी यापूर्वीही नरबळी देण्याचा प्रकार घडला आहे. यासर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.