अमरावती : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अमरावती शाखेने आयुर्वेदिक डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील ५८ शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देणार्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या नोटिफिकेशनला विरोध दर्शविला आहे.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, सचिव अशिष साबू, दिनेश ठाकरे, नीलिमा ठाकरे, पद्माकर सोमवंशी, वसंत लुंगे, भारती लुंगे, मनीष राठी, सोनाली शिरभाते, भरत शहा, जागृती शहा, सोमेश्वर निर्मळ, अनुराधा तोटे, मीनल बावनकर, संगीता कडू, शर्मिष्ठा बेले, नीरज मुरके, पल्लवी मुरके, राजेंद्र ढोरे, श्रुती खंडेलवाल, दिनेश वाघाडे, स्वप्निल पाटील, भूपेश भोंड, विक्रम देशमुख जनसंपर्क अधिकारी ऋषीकेश नागलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी निषेधाचे फलक झळकवले तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले.