शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गासाठी पिवळ्या मातीचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:26 IST

तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात मुरूमऐवजी पिवळ्या मातीचा वापर केला जात आहे. या खननाकरिता उपविभागीय अधिकाºयांनी परवानगी दिली असून, कंत्राटदार एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रकद्वारा खनन करीत असल्याचा आरोप होत आहे. या रॉयल्टीवर तालुक्याचा व संबंधित गावाची माहितीच नाही. त्यामुळे या रॉयल्टी पासेस संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देकिमान ३० फूट खोदले : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या रॉयल्टी पास संशयास्पद

सुमीत हरकूट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात मुरूमऐवजी पिवळ्या मातीचा वापर केला जात आहे. या खननाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, कंत्राटदार एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रकद्वारा खनन करीत असल्याचा आरोप होत आहे. या रॉयल्टीवर तालुक्याचा व संबंधित गावाची माहितीच नाही. त्यामुळे या रॉयल्टी पासेस संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.सध्या तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात पिवळ्या मातीचा वापर केला जात आहे. याचे खनन मौजा पिंपळखुटा, कुरळपुर्णा येथून केले जात आहे. पिवळ्या मातीकरिता कंत्राटदाराने जमिनीपासून ३० ते ४० फूट खोल खोदून खनन केले आहे. याकरिता उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी परवानगी दिल्याची माहिती आहे. उपविभागीय कार्यालयातर्फे दिलेल्या रॉयल्टी वर खनन होत असलेल्या गावाची कोणतीच माहिती नसून कोºया रॉयल्टी पासेस देण्यात आल्या आहेत. या पासेसचा वापर ट्रकचालक ३ ते ४ वेळी करीत असल्याची माहिती स्वत: ट्रकचालकाने दिली. त्यामुळे हे उत्खनन नियमबाह्य असताना महसूल विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.अवैध खनन व रॉयल्टी पासच्या गैरवापरासंदर्भात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.