शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

डाकसेवक व्हायचे तर सायकल शिका !

By admin | Updated: May 11, 2017 00:10 IST

सायकलवरून पत्र घेऊन येणारा पोस्टमन प्रत्येकाला आठवतो. हीच परंपरा भारतीय डाक विभाग आजही जपत असल्याचे ...

डाक विभागाची अट : ग्रामीण डाकसेवक पदाची भरती, २१ मे पर्यंत मुदतवाढ लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सायकलवरून पत्र घेऊन येणारा पोस्टमन प्रत्येकाला आठवतो. हीच परंपरा भारतीय डाक विभाग आजही जपत असल्याचे डाकसेवक पदांच्या जागा भरण्यासाठी डाक विभागाने ठेवलेल्या उमेदवाराला सायकल चालविण्याच्या अटीवरून दिसून येते. एकूण १ हजार ७८९ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले असून त्यासाठी २१ मेपर्यंत आता मुदत देण्यात आली आहे.पूर्वी सायकलवरून पोस्टमन संपूर्ण गावात पत्र वाटप करायचे. पोस्टमनसाठी सायकल पूर्वीपासूनच महत्वाची साथीदार आहे. परंतु मोटारसायकल आल्यानंतर पोस्टमनकडील सायकलही हटवली गेली. बहुतांश पोस्टमन आज दुचाकीने डाक वाटताना दिसत आहेत. मात्र, डाक विभाग पोस्टमनसाठी सायकलची परंपरा आजही कागदोपत्री जपत आहे. भारतीय डाक विभागाकडून राज्यभर ग्रामीण डाकसेवक पदाच्या जागा भरण्यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ग्रामीण डाकसेवक पदाच्या उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ६ मे ठेवण्यात आली होती मात्र आता यासाठी २१ मे मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विविध अटी, शर्ती आहेत. यात उमेदवारांना संगणकाचे ज्ञान आवश्यक असून ६० दिवस मुलभूत संगणकाचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी पोस्टमास्तर म्हणून निवड झाली, त्या गावात राहणे आवश्यक आहे. उमेदवाराला सायकल चालविता येणे आवश्यक असल्याची अट भारतीय डाक विभाग लादल्याने सायकलवर पत्र वाटप करण्याची परंपरा कागदोपत्री टिकवून ठेवत असल्याचे दिसून येते.विभाग हायटेक अट मात्र पारंपारिक या संगणकाच्या युगात भारतीय डाक विभागही हायटेक झाला आहे. डाक विभागाने नागरिकांच्या सुविधेकरिता वेगवेगळे संकेतस्थळ निर्माण केले आहेत. ई-पोस्ट, डिजिटल पोस्ट विभाग यासारख्या उपक्रमामुळे डाक विभागही हायटेक झाल्याचे दिसून येते. विभाग हायटेक होऊनही ग्रामीण डाकसेवक पदांच्या जागा भरण्यासाठी अटी मात्र पारंपारिकच ठेवण्यात आल्या आहेत.