शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

१०२ कोटी मिळाल्यास पालिकेचे वारे न्यारे !

By admin | Updated: February 16, 2017 00:12 IST

अमरावती महापालिकेला विविध अनुदानापोटी राज्य सरकारकडून तब्बल १०२ कोटी रुपये घ्यायचे आहेत.

पाठपुराव्याला राज्य शासनाचा ‘खो’: एलबीटीची नुकसान भरपाई प्रलंबित अमरावती : अमरावती महापालिकेला विविध अनुदानापोटी राज्य सरकारकडून तब्बल १०२ कोटी रुपये घ्यायचे आहेत. प्रशासनाच्या स्तरावरुन हा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा होत असतांनाही निधी न मिळाल्याने पालिकेच्या विपन्नावस्थेत भर पडली आहे. ‘ड’ वर्ग महापालिका असलेल्या अमरावती महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत अतिशय मर्यादित आहेत. मालमत्ता करातून येणाऱ्या ३० ते ३२ कोटींसह बांधकाम परवानागी शुल्क व इतर कराच्या माध्यमातून महापालिकेला वर्षाकाठी जवळपास ९० ते १०० कोटींचा महसूल प्राप्त होता. मात्र या रकमेत कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च भागविला जातो .महापालिकेचा आस्थापना खर्च ६५ टक्क्यांवर गेल्याने पालिकेच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहे. या पार्श्वभूमिवर महापालिकेची आर्थिक शिस्त शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर बसते. त्यातूनच अनेक विकासकामे केली जातात. तथापि १९९७-९८ पासून २०१६ पर्यंत विविध अनुदानातून महापालिकेला देय असलेले तब्बल १०२ कोटीचे अनुदान राज्य शासनानकडे अडकले आहे. प्रत्येकच सत्ताधीश हा कोट्यावधींचा अटकेलेला निधी खेवून आणण्याचा दावा करतो. मात्र अनेक सत्ताधीशांचे हे दावे अद्यापर्यंत तरी निखालस खोटे ठरले आहेत.सत्ताधीशांसह महापालिका प्रशासनाच्या वतीने ही शासनाच्या संबंधित विभागाकडे या निधीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्याला यश आले नाही. दुसरी कडे जकातीला पर्याय म्हणून एसबीटी ही प्रणाली महापालिकेत कार्यान्वित ठरण्यात आली. त्यानंतर एलबीटी प्रणालीही (दारु व्यतिरिक्त संपुष्ठात आली. मात्र जकातीचा तुलनेत अपेक्षित असलेली एलबीटीची नुकसानभरपाई महापालिकेला मिळू शकली नाही. महिन्याला किमान १० ते ११ कोटी रुपये एलबीटीचे नुकसान भरभाई शासनाकडून अपेक्षित असतांना महिन्याकाठी केवळ ७ ते सव्वासात कोटी रुपये मिळतात. याखेरिज विविध अनुदान थकल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिति अत्यंत बेताची झाली आहे. मोठा आर्थिक हातभार एलबीटीची नुकसान भरपाई म्हणून अमरावती महापालिकेला तब्बल ४५ कोटी रुपये, तर अकोली वळण रस्ता वाढीव भूसंपादन निधीचे २० कोटी मिळाल्यास महापालिकेची आर्थिक परिस्थितित कायापालट होवू शकतो. १९९४ ते २००८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे ८ कोटीचे अनुदान मिळाल्यास आर्थिक बोझा कमी होवू शकतो. मात्र २० वर्षापासून रखडलेला हा निधि ‘ड’ वर्ग महापालिकेला देण्याचे सौजन्य राज्य शासनाने दाखविला नाही.