शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता मिळाली नाही तर ‘ते’ वेडे होतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:12 IST

पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. वरूड येथे आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अनिल बोंडे यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देसदाभाऊ खोत : वरूड येथील राष्टÑीय कृषी परिषदेत प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. वरूड येथे आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अनिल बोंडे यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह यावेळी उपस्थित होते.सन २०२२ पर्यंत शेतकरी स्वयंभू झाला पाहिजे. १५ वर्षे सत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी राजेशाही थाटात राहून स्वत: मालक आणि जनता गुलाम बनविली. त्यांनी शाळा-महाविद्यालये, कारखाने काढले. परंतु, या साडेचार वर्षांच्या काळात आमच्या सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही, असा दावा त्यांनी केला. आम्ही आमच्या वाहनावरील लाल दिवे हटविले आणि जनतेला राजा समजून काम करायला लागलो. म्हणून विकासाचा टक्का वाढला. महाराजस्व अभियानासारखी शिबिरे सुरू करून ‘शासन आपल्या दारी’ आणल्याचे खोत म्हणाले.वरूडच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे, उपाध्यक्ष मनोज गुल्हाने, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे, वसुधा बोंडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, गटविकास अधिकारी विजयसिंह राठोड, सुभाष बोपटे, माजी बालकल्याण सभापती अर्चना मुुरुमकर, पं.स. सदस्य अर्चना तुमराम, प्रमोद खासबागे, नलिनी रक्षे, शशिकांत उमेकर, इंद्रभूषण सोंडेंसह आदी उपस्थित होते.कोल्हे दाम्पत्याचा गौरवमेळघाटात सामाजिक कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्यासह झटामझीरी, पिंपळखुटा या ग्रामपंचायतींना वॉटर कप स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांचा शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.