शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास रस्त्यावर उतरू

By admin | Updated: December 3, 2015 00:18 IST

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून ....

इशारा : युवक काँग्रेसचा सरकारला अल्टिमेटम नांदगाव पेठ : अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून आता सहनशीलतेचा अंत न पाहता शासनाने अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवक काँग्रेसने तिवसा विधानसभा अध्यक्ष हरीष मोरे यांनी दिला आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती खालावत चालली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाणही कमी होते. स्वत:च्या मेहनतीने तोंडापर्यंत आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जाचे ओझे वाढत चालले असून शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा व लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनवेळचे जेवणही यावर्षी शेतीतून मिळणे कठीण झाले असताना सरकारने चुकीच्या पध्दतीने आणेवारी मांडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास घट्ट करण्यासारखे आहे. शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आत्महत्येचा पर्याय शिल्लक ठेवला असून बळीराजाला जीवनदान देणे कर्तव्य असल्याचे हरीश मोरे यानी सांगितले. युवक काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आता संघर्ष करण्यासाठी वेळ आली आहे. आता शेतकऱ्यांचा संयम संपला असून शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने जर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हरीश मोरे यांनी दिला आहे. (वार्ताहर)