शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

‘आयकॉन्स’ समाजासाठी प्रेरक

By admin | Updated: June 10, 2017 00:08 IST

संघर्षातून यशाचे शिखर गाठणाऱ्या व मिळालेल्या यशाचा काही वाटा समाजासाठी राखून ठेवणाऱ्यांना पुरस्कृत करून इतरांना प्रेरणा देण्याचे काम ...

सुधीर मुनगंटीवार : लोकमत कॉफीटेबल बुकचे थाटात प्रकाशनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संघर्षातून यशाचे शिखर गाठणाऱ्या व मिळालेल्या यशाचा काही वाटा समाजासाठी राखून ठेवणाऱ्यांना पुरस्कृत करून इतरांना प्रेरणा देण्याचे काम ‘लोकमत’ने कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून केल्याचे गौरवोद्गार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे काढले. हॉटेल ग्रॅन्ड महेफिलमध्ये रंगलेल्या ‘लोकमत आयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याला ते विशेष पाहुण्याच्या भूमिकेतून संबोधित करीत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा, आमदार समीर कुणावर, आमदार वीरेंद्र जगताप तसेच लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, अमरावती युनिटचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आणि संपादकीय प्रमुख गणेश देशमुख हे उपस्थित होते. तत्पूर्वी अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील आयकॉन्सचा समावेश असलेल्या ‘आयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या शानदार कार्यक्रमाला ‘आयकॉन्स’, त्यांचे कुटुंबीय, तिन्ही जिल्ह्यांतील प्रतिष्ठित नागरिक आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जगाच्या पटलावर एकमेव भारतीय संस्कृती तग धरून आहे. ती टिकविण्यासाठी हजारोंचे परिश्रम कामी आले आहेत. ही एक निरंतर प्रक्रिया असल्याने यात स्वयंस्फूर्त योगदान देणाऱ्यांचे कौतुक व्हायलाच हवे, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आयकॉन्सच्या कर्तृत्वाची नोंद घेतली. आभाळाएवढे कार्य समाजासमोर- ना. रणजित पाटीलसमाजाच्या विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे आभाळाएवढे काम समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आयकॉन्स’ या ‘कॉफीटेबल बुक’ची संकल्पना आकारास आणली आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यांतील अशा व्यक्तींचा शोध घेऊन प्रकाशित करण्यात आलेले हे ‘कॉफीटेबल बुक’ म्हणूनच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी व्यक्त केले.‘लोकमत’शिवाय पहाटनाही -ना. प्रवीण पोटेआॅयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा या ‘कॉफीटेबल’ बुकचे कौतुक करताना ‘लोकमत’शिवाय पहाटच उजाडत नाही. ‘लोकमत’ने वाचकांच्या हृदयात केव्हाचीच जागा मिळविली आहे. त्यांनी निवडलेले ‘आयकॉन्स’ही समाजाला यशपथ दाखविणारे असल्याचे उद्गार पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी काढले.‘लोकमत’साठीच नव्हे, देशासाठी महत्त्वाचा क्षण- विजय दर्डाजिल्ह्याच्या ठिकाणी राहून जिद्दीने आणि पराक्रमाने ‘आयकॉन्स’ ठरलेल्यांचा हा गौरव सोहळा ‘लोकमत’साठीच नव्हे, तर राज्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचा क्षण आहे, अशा शब्दांत लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी अमरावती, वर्धा आणि यवतमाळमधील आयकॉन्सना शुभेच्छा दिल्या. सन २०११ पासून ‘लोकमत’ने ‘आयकॉन्स कॉफीटेबल बुक’ची सुरूवात केली. यात बिझनेस आयकॉन्स, विमेन आयकॉन्स, एज्युकेशन आयकॉन्स अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववीरांची स्वतंत्र नोंद घेणारे कॉफीटेबल बुक्सचेही प्रकाशन केले गेले. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जीं, रतन टाटा, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, स्मृती इरानी, अजय देवगण अशा अनेक दिग्गजांंनी कॉफीटेबल बुकच्या विविध प्रकाशन समारंभांना उपस्थिती दर्शविली. तोच धागा पुढे नेत अमरावती येथील प्रकाशन सोहळ्याला ना. सुधीर मुनगंटीवार, ना.प्रवीण पोटे, ना.रणजित पाटील हे मान्यवर उपस्थित असल्याचा आनंद विजय दर्डा यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’ केवळ पत्रकारितेपुरता मर्यादित नसून समाजपूरक उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे. त्याच भावनेतून कर्तृत्ववीरांच्या कार्याची दखल ‘लोकमत’ने घेतली असल्याची भावना व्यक्त करून वाचकांच्या आशीर्वादाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.रंगीबेरंगी प्रकाश किरणांनी न्हाऊन निघालेल्या, रेडकार्पेटने सुसज्ज अशा आलिशान दालनात आयोजित या शाही कार्यक्रमात ‘आयकॉन्स’ना कॉफीटेबल बुक व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी गणेश देशमुख, सुशांत दांडगे आणि विकास मिश्र यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार प्रदर्शन यवतमाळ हॅलो हेड राजेश निस्ताने यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित ‘आयकॉन्स’चे ग्रुप फोटोसेशनही करण्यात आले. असा रंगला ‘आॅयकॉन्स’ सोहळाप्रशस्त हॉलच्या प्रवेशद्वारापासून अंधरलेले ‘रेड कार्पेट’ प्रकाशन समारंभाचे ‘खास’ पाहुणे असलेले आॅयकॉन्स, त्यांचे कुटुंबिय, मोमॅन्टो आणि कॉफी टेबल बुकसह ‘आयकॉन्स’नी केलेले फोटोसेशन आणि आॅयकॉन्सचे मान्यवरांनी केलेले गोड कौतुक, ही ‘या ‘ग्रँड’ कार्यक्रमाची वैशिष्ट्ये.’सायंकाळी ७ च्या सुमारास या ‘ग्रँड’ कार्यक्रमाला सुरूवात झाली. अगदी प्रवेशद्वारावर आॅयकॉन्सचे तुतारीच्या निनादात स्वागत करून ‘आॅयकॉन्स’चे गुलाबपुष्प देऊन फोटोसेशन करण्यात आले. व्यासपिठाच्या अगदी समोर मान्यवर पाहुण्यांसह ‘आॅयकॉन्स’ची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या मागे त्यांचे कुटुंबीय व अन्य निमंत्रित स्थानापन्न झाले. ‘आॅयकॉन्स’नी परस्परांचा परिचयही करून घेतला. आॅयकॉन्सचे चेहरे हर्षभरित होते. प्रत्येकाला कॉफी टेबल बुकची आणि त्यात टिपलेली स्वत:ची छबी पाहण्याची, अनुभवण्याची उत्सुकता होती. अमरावती, वर्धा आणि यवतमाळच्या ७० ‘आॅयकॉन्स’ना कॉफीटेबल बुक आणि मोमेंटो सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. अतिशय दिमाखात झालेल्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘आॅयकॉन्स’ असल्याने प्रत्येक उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. व्यासपीठाच्या दोन्ही बाजूने लावण्यात आलेल्या ‘डिजिटल स्क्रीन’वर आॅयकॉन्सची छबी उमटत होती.हे आहेत ‘लोकमत आयकॉन्स’ डॉ. नितीन धांडे, चंद्रकुमार जाजोदिया, पुरणसेठ हबलानी, उदय देशमुख, जगदीश मिहाणी, अभिजित देशमुख, अमोल डोईफोडे, पंकज काशेटवार, अनिल आसलकर, अनिरूद्ध ऊर्फ बबलू देशमुख, अरूण वरणगावकर, अतुल जिराफे, विजय जिराफे, अतुल-अमृता गायगोले, डॉ. अतुल यादगिरे, डॉ. भानुप्रकाश कदम, भैयासाहेब ठाकूर, चैतन्य इंगळे, दीपक आसेगावकर, देवीदास गोपालानी, धनंजय धवड, घनशाम बागडी, जगदीश वाधवानी, जगजितसिंग ओबेरॉय, जयंत दलाल, कमलकिशोर जयस्वाल, कमलेश डागा, कांचनमाला गावंडे, आ. वीरेंद्र जगताप, अ‍ॅड. यशोमती ठाकूर, महेंद्र भुतडा - अजय दातेराव, मनोज दारोकर, मिलिंद देशमुख, नरेंद्र भाराणी, नितीन देशमुख, नितीन गभणे, डॉ. पंकज हरकुट, पराग राऊत, पी. बी. आडे, डॉ. प्रणय कुळकर्णी, राजन पाटील - शैलेश ठुसे, राजेश डागा, राजू मुंधडा, महेंद्र बैस, रविंद्र गायगोले, राहुल ठाकरे, सचिन हिवसे, साधुराम वाधवाणी, आ. समीर कुणावार, संजय चिद्दरवार, संजय हरवानी, संजय खोडके, शैलेंद्र देशमुख, शैलेश वानखडे - नितीन शेंद्रे, शेखर भोयर, आ. श्रीकांत देशपांडे, शाम खंडेलवाल, सुजाता - विलास महाजन, सुनील वऱ्हाडे, सुनील झोंबाडे, उद्धवराव फुटाणे, विनोदकुमार जैन, विलास कथे. ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुककॉफीटेबल बुकच्या माध्यमातून प्रेरक काम करणाऱ्या वल्ली शोधून त्यांचे कर्तृत्व समाजापुढे सादर करणाऱ्या ‘लोकमत’च्या या उपक्रमाची राज्याच्या अर्थमंत्री मुनगंटीवारांसह गृहराज्यमंत्री रणजित पाटील, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांतून राज्यात आणि देशात नाव चमकविणाऱ्यांचा गौरव करण्याची संधी मिळाल्याचा आनंद ‘लोकमत’ समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केला. या कौतुकामुळे नवी भरारी घेण्याची उमेद निर्माण झाल्याच्या प्रतिक्रया आयकॉन्सने व्यक्त केल्यात.