किशोरवयीन मुलांच्या मानसिक तक्रारीअमरावती : जिल्ह्यात किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वाढत्या वयानुसार होणाऱ्या शारीरिक बदलाची वाटणारी भीती वा त्यांना योग्य दिशा देण्याच्या अनुषंगाने शासनाद्वारे सन २०१४ पासून राज्यभर किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत एका मुलाने अभ्यासाल बसतो, पण मनच लागत नाही, यावर उपाय काय, असा सवाल केल्याची माहिती समुपदेशक मनोज सहारे यांनी दिली.
किशोरवयीन मुले जसजसे वय वाढत जाते तसतसे शारीरिक बदलाने भयभीत होतात. घोगरा आवाज, काही ठिकाणी नव्याने केस वाढीस लागणे, चेहऱ्यावर मुरूम आदी बदलामुळे त्यांच्या अस्वस्थता निर्माण होऊ लागते. अशावेळी नवीन गोष्टी शिकण्याची, आकलनाची वृत्ती वाढीस लागते. दरम्यान समाजातून मिळणारे मार्गदर्शन हे योग्य असणे गरजेचे असते. अन्यथा त्यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता असते. त्यातून देशाचे उद्याचे भविष्य राहणारी ही मुले कमकुवत वा आत्मविश्वास गमालेले उदयास येऊ शकतात. हे टाळण्याकरिता शासनातर्फे सन २०१४ पासून राज्यभरात किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंमलात आणले गेले. त्याअनंतर मुला-मुलींना व्यसनमुक्ती, तंबाखू, दारू, विडी, सिगारेट, एकतर्फी प्रेम प्रकरणासारख्या प्रसंगातून वाचविण्याकरिता समुपदेश केले जातात. यासाठी जिल्ह्यात चार केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालया तसेच अमरावती उपजिल्हा रुग्णालय आणि वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात यासंबंधी माहिती दिली जाते. येथे महिन्यातून ४० ते ४० मुले-मुली भेट देऊन आपल्या समस्यांचे निराकरण करीत असल्याची माहिती मनोज सहारे यांनी दिली.
बॉक्स
मोबाईलशिवाय करमत नाही
सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने अँड्रॉईड मोबाईल प्रत्येक घरात दिसतो. त्यातही लहान मुले-मुली मोबाईलचा वापर करतात. विविध माहिती हस्तगत करतात. मनाला आवडेल, अशी माहिती मिळविण्यात मुले रात्रंदिवस मोबाईलशी जुळलेले असतात. आग्रह केल्यानंतर काहींना वडील मोबाईल घेऊन देत नसल्याने आत्महत्येचा पाऊल उचलण्याचा प्रकार अनेक ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांना हतबल व्हावे लागत असल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनच्या काळात कार्यक्रम नाहीच
कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा-महाविद्यालये बंदच असल्याने यंदा शिबिरे झालीच नाहीत. त्यामुळे केवळ सेंटरवर येणाऱ्या मुला-मुलींना विविध समस्यांवर समुपदेशन केले जात आहे. दर महिन्याला ५० वर मुले-मुली तक्रारी घेऊन येतात.
सन २०१९-२० मध्ये झालेले समुपदेश
२९२१
सन २०२०-२१ मध्ये
१९८६
एप्रिल १२५, मे महिन्यात १२१, जून-१८९, जुलै १४५, ऑगस्ट १४१, सप्टेंबर १३८, ऑक्टोबर १८२, नोव्हेंबर १७३, डिसेंबर २७२, जानेवारी २४०, फेब्रुवारी २६० मार्च -- असे एकूण १९८६ मुला-मुलींचे समुपदेशन केल्याची माहिती माहिती सहारे यांनी दिली.
-कोट
जिल्ह्यात चार सेंटर स्थापन केले असून, नियमित समुपदेशन केले जात आहे. आवश्यकतेनुसार औषधींचा पुरवठादेखील केला जात आहे. बहुतांश मुला-मुलींना समुपदेशनाचा लाभ होत आहे.
- श्यामसुदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक