शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे व्यवहार आटोपण्याची घाई

By admin | Updated: March 27, 2015 00:02 IST

१ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी आयकर भरणा, जुने व्यवहार आटोपणे, आॅडीट व इतर बँकेची कामे व्यापारी उद्योजक...

अमरावती : १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी आयकर भरणा, जुने व्यवहार आटोपणे, आॅडीट व इतर बँकेची कामे व्यापारी उद्योजक आणि संस्थांमध्ये सुरू आहेत. मात्र सलग वेगवेगळ्या कारणांमुळे सुट्या आल्याने २८ मार्च ते ५ एप्रिलपर्यंत बँकेचे व्यवहार केवळ अडीच दिवस होणार असल्याने बँकेचे मोठे व्यवहार आटोपण्याची घाई सुरू झाली आहे. अवघ्या पाच दिवस मार्चचा अखेर येऊन ठेपला आहे. त्यानंतर नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. नव्या आर्थिक वर्षापासून नवनवीन कररचना, नियमावली लागू होणार आहेत. त्यामुळे वर्षभरात केलेले व्यवहार पूर्ण करण्याकडे बहूतांश जणांचा कल असतो. मात्र २८ ते ५ एप्रिल दरम्यान म्हणजेच नऊ दिवसामध्ये केवळ अडीच दिवस राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँका आणि पतसंस्था सुरू राहणार आहेत. त्यामुळे बँक खातेधारकांना पुढील आठवड्याची आर्थिक तरतूद २७ मार्चपूर्वी करणे गरजेचे आहे. ३० ते ३१ मार्चला पूर्णवेळ व चार एप्रिलला अर्धवेळ बँका सुरू राहतील. मात्र या दिवशी बँकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ व २९ मार्च आणि १ ते ३ एप्रिल रोजी रामनवमी, रविवार, बँक क्लोजिंग, महावीर जयंती, गुडफ्रायडे आणि पुन्हा रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. बँकांच्या ग्राहकांनी मोठे व्यवहार शक्यतो २४ ते २७ मार्च दरम्यान करून घ्यावे लागणार आहे. नऊ पैकी तीन दिवस बँका सुरू असल्या तरी मोठी गर्दी होते. काही बँकांनी कॅश भरणा, पासबुक प्रिंटींगची व्यवस्था संगणकीकृत मशिनद्वारे केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी बँकांनी घेतल्याचे बँकेचे अधिकाऱ्यांने सांगितले. एकंदरीत बँक व्यवहाराचा व्याप एटीएमवर वाढणार आहे. (प्रतिनिधी)