शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो महिलांची वीज कार्यालयावर धडक

By admin | Updated: July 2, 2016 00:15 IST

नजीकच्या आमला विश्वेश्र्वर येथे मागील दहा दिवसांपासून रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरू आहे.

आमला विश्वेश्वर येथे अघोषित लोडशेडिंग : वीजपुरवठा नियमित करण्याची मागणीचांदूररेल्वे : नजीकच्या आमला विश्वेश्र्वर येथे मागील दहा दिवसांपासून रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे हैराण झालेल्या येथील शेकडो महिलांनी शुक्रवारी स्थानिक वीज कार्यालयावर धडक देऊन अघोषित लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली. या महिलांनी उपकार्यकारी अभियंता बिजवे यांना लेखी निवेदन दिले. बिजवे यांनी वीज पुरवठा वारंवार खंडित होऊ नये, यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महिलांच्या या मोर्चाचे नेतृत्त्व सरपंच रजनी मालखेडे यांनी केले. यावेळी अपेक्षा होमिओ सोसायटीच्या मनू वरठी, सोमेश्वर चांदूरकर आदींची उपस्थिती होती. आमला विश्वेश्वर परिसरात अघोषित लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दररोज रात्री वीज गुल होते. परिणामी शेतीच्या कामावरून थकून घरी आलेल्या ग्रामस्थांच्या झोपेचे खोबरे होते. आजारी, वृद्ध आणि लहान मुलेदेखील या अघोषित भारनियमनामुळे हैराण झाले आहेत. अखेर संतप्त होऊन महिलांनी वीज कार्यालयावर धडक देऊन निषेध नोंदविला व सुरळीत विद्युत पुरवठ्याची मागणी केली. महिलांचा रोष पाहून उपकार्यकारी अभियंता बिजवे यांनी महिलांना यापुढे सुरळीत विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ही स्थिती उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. आमला विश्वेश्वर हे गाव पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. हे गाव चांदूररेल्वे ग्रामीण विद्युत कार्यालयाला जोडण्यात आले आहे. या गावाकरिता विद्युत मंडळाने तांत्रिक सेवकाची नियुक्ती देखील केली आहे. परंतु तो कायमस्वरूपी नसल्याने विजेमधील बिघाड तातडीने दुरूस्त होत नाही. त्यामुळे येथे कायमस्वरूपी तांत्रिक सेवकाची नियुक्ती करण्याची मागणी आहे. निवेदन देताना कल्पना केने, ज्योती कावलकर, सुचिता चर्जन, माधुरी डोंबारे, रजनी होडे, रजनी कावलकर, संगीता हंबर्डे, सविता श्रीखंडे, ज्योत्सना उगले, सविता मोहोड, सुनीता शिरपूरकर, विद्या बोबडे, कमला कळमकर, पूजा दुबे, प्रिया मेश्राम, साधना शेळके, आशा दुबे, सुशीला बकाले, शारदा बकाले, वैजयंती चर्जन, माधुरी बकाले, संगीता खेरडे, अमिता वैद्य, नलिनी तिवाडे, शोभा नंदरघने, भावना नंदरधने, वंदना कर्डुकार यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)