शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यापासून शेकडो शेतकरी वंचित

By admin | Updated: June 23, 2016 00:06 IST

नांदगाव तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये शेकडो शेतकऱ्यांनी पीकविमा काढला व ही रक्कम बँकेत जमासुध्दा झाली.

पुनर्गठनालाही नकार : सेंट्रल बँकेची मनमानीनांदगाव खंडेश्वर : नांदगाव तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये शेकडो शेतकऱ्यांनी पीकविमा काढला व ही रक्कम बँकेत जमासुध्दा झाली. परंतु अद्याप शेतकऱ्यांना पिकविमा रकमेचे वाटपच झाले नाही. सेंट्रल बँक व्यवस्थापक कर्ज पुनर्गठनाससुध्दा नकार देत असल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, यासाठी युवासेनेने दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.खरीप हंगामात पेरणी सुरु झाली असताना सन २०१४-१५चीविमा रक्कम सेंट्रल बँकेच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे शेतात पेरणी कशी करायची, या विवंचनेने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी बँकेच्या चकरा मारीत आहेत. बँक व्यवस्थापन शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परतवून लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. याबाबत युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी बँक व्यवस्थापकाला निवेदन देऊन शेतकऱ्यांची आपबीती कथन केली. दोन दिवसात जर शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, गजानन खोडे, शिवाजी मेश्राम, मनोज बनारसे, भोला वैरागडे, महादेव चव्हाण, सुरज लोमटे, अभय बनारसे, मयुर काकडे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांकडे युवासेनेची तक्रारहवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सहकार्य करावे, यासाठी युवासेनेचे प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सेंट्रल बँक व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली व सन २०१४-१५ ची पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देऊन निदान पेरणीसाठी तरी ही रक्कम कामी यावी, अशी विनंती केली.