शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘ओन रिस्क’वर वाहन पार्किंग कसे?

By admin | Updated: November 5, 2016 00:09 IST

दिवसाकाठी लक्षावधी रूपयांचा व्यवसाय करणाऱ्या ‘रिलायंस ट्रेन्डझ’ने पार्किंगबाबत मुजोरी चालविली आहे.

‘रिलायन्स ट्रेन्डझ’ची मुजोरी : वाहनस्थळाची जबाबदारी कुबडे हाईट्सची अमरावती : दिवसाकाठी लक्षावधी रूपयांचा व्यवसाय करणाऱ्या ‘रिलायंस ट्रेन्डझ’ने पार्किंगबाबत मुजोरी चालविली आहे. कुबडे हाईट्सने आम्हाला पार्किंगची जागा दिली नसल्याने आम्ही अधिकृत पार्किंग स्थळ उपलब्ध करून देण्यासाठी बांधिल नसल्याचा पवित्रा मॉलच्या कर्त्याधर्त्यांनी घेतला असून ‘पार्किंग आॅन ओन रिस्क’चा सल्ला रिलायन्स ट्रेंडझने दिला आहे. त्यावर ग्राहकांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ‘रिलायन्स ट्रेंडझ’ने पार्किंग व्यवस्थेकरिता कुबडे हाईटस्च्या संचालकांकडे अंगुलीनिर्देश करीत ग्राहक त्यांची वाहने कुबडे ज्वेलर्ससमोरील जागेत ठेऊ शकतात, असा फुकटचा सल्ला देखील दिला आहे. बांधकामाची परवानगी घेताना महापालिकेने पार्किंग व्यवस्था बंधनकारक केली आहे. येथे कुबडे ज्वेलर्सने स्वत:साठी व पोटभाडेकरू असलेल्या हॉटेलसाठी पार्किंग स्थळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या दोन प्रतिष्ठांनाव्यतिरिक्त येथे अन्य वाहन पार्क करू नये, असा सूचनाफलकच येथे लावण्यात आला आहे. ‘रिलायंस ट्रेन्डझ’च्या ग्राहकांना येथे वाहन ठेवण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने अनधिकृत पार्किंग करावे लागते. अनेकदा वाहतूक शाखेकडून ग्राहकांच्या दुचाकी उचलून नेल्या जातात. ही तर ग्राहक हक्कांची अवहेलनाअमरावती : रिलायंस ट्रेन्डस या महागड्या मॉलमध्ये नेहमीच ‘पार्किंग आॅन ओन रिस्क’ अशी फलके झळकतात. ग्राहक हक्काची अवहेलना करणारा हा प्रकार आहे.ग्राहकाला विविध प्रलोभने देऊन आपल्या प्रतिष्ठानातून खरेदीसाठी उद्युक्त करायचे आणि वरून ग्राहकांच्या पार्किंगची पार्किंगची जबाबदारी धुडकावून लावायची, ही कुठली ग्राहकाभिमुखता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.असा आहे फलक ‘रिलायंस ट्रेन्डझ’ कुबडे हाईटसमध्ये स्थापित आहे. मात्र, येथे पार्किंगची सोय नाही. ग्राहक त्यांची वाहने खालच्या अधिकृत पार्किंगमध्ये लाऊ शकतात, असे सांगितले जाते. मात्र, ‘हे पार्किंग फक्त कुबडे ज्वेलर्स व रॅलिश रेसिडेन्सीसाठी उपलब्ध आहे. इतर कोणतेही वाहन येथे पार्क केल्यास जबाबदारी आमची राहणार नाही, आदेशानुसार- कुबडे हाईट्स’ असा फलक येथे लावण्यात आला आहे. त्यामुळे धनदांडग्या रिलायन्स ट्रेन्डझकडे पार्किंग उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होते. पार्किंग नसतानाही सरकारी जागेवर अतिक्रमण करून या प्रतिष्ठानधारकांनी मुजोरी चालविली आहे.