शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात खाटा १४३, रुग्ण २५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:02 IST

जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व जिल्हा स्त्री रुग्णालयात सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. आकस्मिक रुग्णदेखील रोज १० ते १२ असतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांसह मनुष्यबळ मात्र फारच अल्प आहे.

ठळक मुद्दे‘इर्विन’ मध्ये आरोग्य सेवा कोलमडली : प्रशासनाची उदासीनता कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात मेडिसीनच्या रुग्णांकरिता १४३ खाटांची व्यवस्था असताना, दाखल असलेल्या अडीचशे रुग्णांवर उपचार करावे लागले. त्यामुळे एका खाटावर दोन रुग्णांना, तर काहींना जमिनीवर झोपावे लागत आहे. ही स्थिती अनेक वर्षांपासूनची आहे. याला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व जिल्हा स्त्री रुग्णालयात सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. आकस्मिक रुग्णदेखील रोज १० ते १२ असतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांसह मनुष्यबळ मात्र फारच अल्प आहे. अनेक वर्षांपासून रिक्त जागा भरण्यात न आल्याने एका वॉर्डात एकच सिस्टर, एका परिचारकेला ४० ते ६० रुग्णांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. येथील व्यवस्थेत सुधारणा करणे अत्यंत गरजेचे असून, लोकप्रतिनिधींकडून यासंदर्भात पाठपुरावा गरजेचा झाला आहे. वैद्यकीय उपचार उत्तम असले तरी कर्मचाºयावर ताण वाढू लागला आहे. रजादेखील विचार करूनच घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.वॉर्ड सहाचा श्वास गुदमरला - वॉर्ड क्रमांक ६ मध्ये सोमवारी दाखल रुग्णांची संख्या ६५ पर्यंत होती. त्यामुळे जेमतेम २२ खाटांवर दोन-दोन रुग्ण असतानाही काही रुग्णांना जमिनीवर उपचार द्यावे लागले. १९ ते २५ आॅगस्ट दरम्यान ९ हजार ८६७ बाह्यरुग्ण तपासणी झाली आहे.२१७ रुग्णांवर उपचार४ मेडिसीन वॉर्ड १ मध्ये २२ खाटा असून, ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. वॉर्ड २ मध्ये ३० खाटांवर २१ रुग्ण, वॉर्ड ६ मध्ये २३ खाटांवर ४८ रुग्ण, वॉर्ड ८ मध्ये ३० खाटांवर २२ रुग्ण, वॉर्ड १० मध्ये २० खाटांवर ३८ रुग्ण, वॉर्ड ११ मध्ये १८ खाटांवर ४० रुग्ण बुधवारी उपचार घेत होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल