शहरं
Join us  
Trending Stories
1
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
2
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
3
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
4
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
6
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
7
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
8
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
9
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
10
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
11
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
12
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
13
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
14
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
15
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
16
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
17
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
18
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
19
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
20
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

वडाळीतील पिंजऱ्याभोवती पुन्हा मादी बिबट्याच्या घिरट्या

By admin | Updated: August 12, 2014 23:29 IST

वडाळी वनपरिक्षेत्रातील कार्यालयाजवळ असणाऱ्या पिजंऱ्याभोवती पुन्हा ‘त्या’ मादी बिबटचा मुक्तसंचार सुरु झाल्याने वनकर्मचाऱ्यांमध्ये कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील कार्यालयाजवळ असणाऱ्या पिजंऱ्याभोवती पुन्हा ‘त्या’ मादी बिबटचा मुक्तसंचार सुरु झाल्याने वनकर्मचाऱ्यांमध्ये कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वडाळी वनक्षेत्राजवळील नागरिकांना सतर्कं राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.गेल्या चार वर्षापूर्वी वडाळी वनविभाग कार्यालयातील पिंजऱ्यात चंद्रपुर येथील दोन नरभक्षक बिबट बंदिस्त आहे. मात्र, या बिबटांना भेटण्यासाठी जंगलातील मिलनातुर मादी बिबट वडाळीतील पिंजऱ्याभोवती गेल्या काही वर्षात अनेकदा घिरट्या घालताना आढळून येत आहे. मादी बिबट वनविभाग कार्यालयापर्यंत पोहोचल्याने परिसरातील नागरिकांच्या वास्तव्याला धोका निर्माण होऊ नये याकरिता वनविभागाने नागरिकांना सर्तक केले आहे.ठिकठीकाणी बिबट पासून सावधान राहण्याचे बॅनर लावून नागरिकांना सतर्क केले आहे. सद्यस्थितीत पावसाळा सुरु असल्याने वनप्राण्याची प्रजननाची वेळ असल्याचे वनधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळेच जंगलातील मादी बिबट वडाळीतील बंदिस्त बिबटच्या गंधाने आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.मादी बिबटाचे बंदिस्त बिबटाविषयी आकर्षण पाहून वनविभागामध्ये कुतुहल निर्माण झाले असून त्या ठिकाणी असणाऱ्या चौकीदारांची झोप उडाली. बिबट सायंकाळनंतर वडाळीच्या पिंजऱ्याभोवती आढळून आल्याने त्या परिसरात फिरणाऱ्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे.या मादी बिबटचा मुक्त संचार वडाळीतील पिंजऱ्यांभोवती होत आहे. असे वृत्त लोकमतने प्रथम प्रकाशित करताच वनविभागासहीत शहरवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाकडुन नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)