शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लर : पोलीस "कन्फ्यूज्ड"

By admin | Updated: June 19, 2017 00:14 IST

शासकीय कार्यालयाची दिशाभूल करून शॉप अ‍ॅक्टची नोंदणी करणाऱ्या अड्डा-२७ विरुद्धचे दस्तऐवज सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोतवाली पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

कारवाईस विलंब : सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा करणार पोलीस लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासकीय कार्यालयाची दिशाभूल करून शॉप अ‍ॅक्टची नोंदणी करणाऱ्या अड्डा-२७ विरुद्धचे दस्तऐवज सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोतवाली पोलिसांना प्राप्त झाले आहेत. मात्र, कारवाई करण्यासाठी कोतवाली पोलीस "कन्फ्युज" असल्याचे आढळून येत आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी पोलीस आता सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविणार आहेत. अड्डा २७ व कसबा या दोन्ही व्यापारी प्रतिष्ठानांच्या चालकांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाची दिशाभूल करून नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले होते. याच नोंदणी प्रमाणपत्राद्वारे चालकांनी हुक्का पार्लर संस्कृती अमरावतीत आणली. हुक्का पार्लर व्यवसायाआड त्याच ठिकाणी डॉन्स पार्लर सुरू असल्याचा आरोप बजरंग दलाने केल्याने खळबळ उडाली होती. तरुणाईला हुक्काचे व्यसन लावणाऱ्या पार्लरच्या चालकांविरुद्ध बजरंग दलाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार नोंदविली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत हुक्का पार्लरची नोंदणी ही अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यानुसार सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शॉप अ‍ॅक्ट नोंदणी प्रमाणपत्रांचे काम सांभाळणाऱ्या दुकाने निरीक्षकांनी अड्डा-२७ व कसबा पार्लरविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र, ती तक्रार अपूर्ण असल्याचे पाहून दुकाने निरीक्षकांनी संबंधित प्रकरणाचे दस्तऐवज महाआॅनलाईनकडून मागवून पोलिसांकडे सादर केलीत. मात्र, या दस्तऐवजांच्या आधारेच गुन्हा दाखल करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या त्यामुळे तूर्तात ही कारवाई थंडबस्त्यात पडली आहे. यातील संभ्रम दूर करण्यासाठी पोलीस आता सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा करून पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून हुक्का पार्लरसंबंधित दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. मात्र, याच दस्तऐवजांच्या आधारे गुन्हा दाखल करणे उचित राहणार नाही. यासाठी सहायक कामगार आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक