शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गूगल मॅपवर मिळेल घरांचे लोकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:28 IST

तिवसा नगरपंचायतीतर्फे शहरातील मालमत्तांचे जीआयएस (जिओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) सर्वेक्षण केले जाणार आहे. करनिर्धारणासाठी आवश्यक असलेल्या या सर्वेक्षणास शुक्रवारी प्रारंभ झाला. ड्रोन कॅमेराने हे सर्वेक्षण होणार असून, त्याद्वारे गुगल मॅपवर घरांचे लोकेशन पाहावयास मिळणार आहे. शुक्रवारी दुपारी तिवसा पोलीस ठाण्यासमोर आमदार यशोमती ठाकूर व नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी ड्रोन कॅमेऱ्याची कळ दाबून या योजनेची सुरुवात केली.

ठळक मुद्देजीआयएस सर्वेक्षण : मालमत्ता करनिर्धारणानंतर करमागणी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तिवसा नगरपंचायतीतर्फे शहरातील मालमत्तांचे जीआयएस (जिओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) सर्वेक्षण केले जाणार आहे. करनिर्धारणासाठी आवश्यक असलेल्या या सर्वेक्षणास शुक्रवारी प्रारंभ झाला. ड्रोन कॅमेराने हे सर्वेक्षण होणार असून, त्याद्वारे गुगल मॅपवर घरांचे लोकेशन पाहावयास मिळणार आहे. शुक्रवारी दुपारी तिवसा पोलीस ठाण्यासमोर आमदार यशोमती ठाकूर व नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी ड्रोन कॅमेऱ्याची कळ दाबून या योजनेची सुरुवात केली.सर्वेक्षणाचे कंत्राट नाशिक येथील एजंसीला देण्यात आले. या कंपनीने शहरात ४० कर्मचारी नेमले आहेत. मालमत्तांचे सर्वेक्षणासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यात शहरातील सर्वंच मालमत्तांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर करनिर्धारणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालमत्तांचे लोकेशन गुगल मॅपवर टाकले जाणार आहे. संबंधित घराच्या तीन बाजूचे चित्र टाकले जाणार असल्याने सदर घर ओळखण्यासही मदत होणार आहे. तिवसा पोलीस ठाण्यासमोर याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मुख्याधिकारी सचिन गाडे, विरोधी पक्षनेते प्रदीप गौरखेडे, उपाध्यक्ष संध्या मुंदाने, भूषण यावले, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, नरेंद्र विघ्ने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.पहिल्यांदाच सर्वेक्षणग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरातील निवासी व वाणिज्यिक मालमत्तांचे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणाअंती संपूर्ण डेटाबेस एका सॉफ्टवेअरमध्ये संकलित करून नगरपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येईल. त्यानंतर नव्याने करनिर्धारण केले जाईल. करनिर्धारण झाल्यानंतर नगरपंचायतीच्या महसुली उत्पन्नात भरघोस वाढ अपेक्षित आहे.