शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाचे उच्चांकी ८२ टक्के कर्जवाटप, आता रबीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST

अमरावती : यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दशकात सर्वाधिक ८२ टक्के कर्जवाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामध्ये ...

अमरावती : यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दशकात सर्वाधिक ८२ टक्के कर्जवाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ९८ टक्के वाटप केलेले असताना राष्ट्रीयीकृत बँका ७४ टक्क्यांवरच स्थिरावल्या आहेत. यंदाचे खरिपाचे कर्जवाटप संपल्याने आता बँकामध्ये रबीच्या कर्जवाटपाची लगबग होणार आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार, यंदाचे खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकाना १२०१.११ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना बँकांनी आतापर्यंत १,०२,९२१ खातेदारांना ९८८.२६ कोटींचे पीक कर्जवाटप केले आहे. ही ८२ टक्केवारी आहे. यापूर्वी २०१५-१६ चे हंगामात ६५ टक्क्यांपर्यत कर्जवाटप केले होते. त्यानंतर यंदा विक्रमी उच्चांकी कर्जवाटप असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेने दिली.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला कर्जवाटपाचा टक्का माघारला होता. मात्र, कर्जमाफीनंतर दीड लाखांपर्यत कर्ज झाल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला. या सर्व शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

बॉक्स

असे आहे बँकानिहाय कर्जवाटप

राष्ट्रीयकृत बँकाना ६८१.१० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात ५२,८१८ शेतकऱ्यांना ५८०.३० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ही ७४ टक्केवारी आहे. बँकद्वारा १५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १२.२२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ८१ टक्केवारी आहे. याशिवाय जिल्हा बँकेने ४०५ कोटींचे लक्ष्य असताना ४९,०८२ शेतकऱ्यांना ३९५.७४ कोटींचे वाटप केले. ही ९८ टक्केवारी आहे.