शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षितांचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:19 IST

विद्यमान दशकात ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यात किंबहुना अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय आखाड्यात उच्चशिक्षितांचा टक्का २९ वरच आहे. ३४ टक्के उमेदवार दहावीच्या आतील आहे.

ठळक मुद्देराजकीय आखाड्यात शिक्षण : कोणत्या मेरिटवर होते मतदान? ७१ टक्के अंडरग्रॅज्युएट

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यमान दशकात ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यात किंबहुना अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय आखाड्यात उच्चशिक्षितांचा टक्का २९ वरच आहे. ३४ टक्के उमेदवार दहावीच्या आतील आहे. त्यामुळे राजकारणात, निवडणुकीत शिक्षणाला दुय्यम स्थान आहे काय, यामध्ये कोणत्या मेरिटवर मतदान होते आदी विषय प्रकर्षाने समोर आले आहेत.राजकारणात उच्चशिक्षितांनी समोर यावे व शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा, अशी हाक राजकीय पक्षांकडून नेहमीच दिली जाते. मात्र, त्याच राजकीय पक्षांकडून उच्चशिक्षितांना राजकारणाच्या आखाड्यात उमेदवारी दिली जाते काय, हा प्रश्नदेखील यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आला आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून पुरेशा प्रमाणात उच्चशिक्षितांना उमेदवारी तर नाहीच; मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी या निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल करणाऱ्या अपक्षांमध्येदेखील उच्चशिक्षितांचे प्रमाण नगण्य आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी २४ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये पाच उमेदवार पदवीधर, दोन पदव्युत्तर व अन्य उमेदवार पाचवी ते अंडरगॅ्रज्युएट आहेत. विशेष म्हणजे, आयोगाकडे दाखल शपथपत्रात बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही एका ओळीत किंवा एका शब्दात संपली. त्यामुळे शिक्षणाच्या पंढरीत राजकीय आखाड्यात शिक्षण हा मुद्दा दुर्लक्षित असल्याचे वास्तव आहे. उमेदवारांची कागदपत्रे व शपथपत्र निवडणूक कार्यालयाच्या प्रसिद्धी फलकावर व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आले.उच्चशिक्षितांचा पुढाकारच नाहीअमरावतीत २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसुळ यांची बी.कॉम., महाआघाडी समर्थित नवनीत राणा दहावी, बसपाचे अरुण वानखडे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका व पत्रकारिता पदविका तसेच वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांची कृषी पदविका अशी शैक्षणिक पात्रता आहे. नीलिमा भटकर (बीई संगणक), प्रमोद मेश्राम (एमए बीपीएड), राजू जामनेकर (एमए समाजशास्त्र), श्रीकांत रायबोले (बीए बीपीएड), पंचशीला मोहोड (बी.एस्सी.), पंकज मेश्राम (बीए), विजय विल्हेकर (प्री बायोलॉजी), संजय आठवले बीए (अंत्य), राजू सोनोने (बीए अंत्य), प्रवीण सरोदे बीकॉम (द्वितीय), नीलेश पाटील (बारावी), अनिल जामनेकर (बारावी), नरेंद्र कठाणे (बारावी), विलास थोरात (बारावी), ज्ञानेश्वर मानकर (दहावी), मीनाक्षी कुरवाडे (दहावी), राहुल मोहोड (दहावी), अंबादास वानखडे (आठवी), राजू मानकर (पाचवी) अशी उमेदवारांची अर्हता आहे.मतदार देतात का राजकीय नेत्यांच्या शिक्षणावर भर?नेत्यांच्या कर्तृत्वाने होतो विकास सिद्धउच्चशिक्षित असल्यासच तो विकास करू शकतो, ही बाब भारतीय राजकारणात गौण आहे. अनेक अंडरग्रॅज्युएट नेत्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले आहे, असे प्रदीप गौरखडे यांनी सांगितले.शिक्षणाचा टक्का कमी ही चिंतेची बाबराजकारणात शिक्षितांचा टक्का कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे. लोकशाही सुदृढ करण्यास उच्चशिक्षितांनी हिरीरीने समोर यायला पाहिजे, तरच लोकशाही टिकेल, असे रवींद्र देशमुख म्हणाले.मतदारांनी शिकवावा मतदानाद्वारे धडामुळात राजकीय पक्षांना शिक्षणामध्ये रस नाही. अलीकडे जात,धर्म, समाज हा मुद्दा वरचढ ठरत आहे. मतदारांनीच यासाठी धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया दीपक गोफने यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक