शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत पवारांकडून धनाढ्यांचे मनोरंजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:47 IST

वैद्यकीय रजेच्या कालावधीत आयुक्त हेमंत पवार हे धनाढ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांचे मनोरंजन करीत आहेत.

ठळक मुद्देहीच काय वैद्यकीय रजा ? : युवा स्वाभिमानचा सवाल, विभागीय आयुक्तांकडे दाद

आॅनलाईन लोकमतअमरावती : वैद्यकीय रजेच्या कालावधीत आयुक्त हेमंत पवार हे धनाढ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांचे मनोरंजन करीत आहेत. अमरावतीच्या विकासाशी त्यांना कुठलेही देणेघेणे नाही. अशा बेजबाबदार आणि कर्तव्यशून्य आयुक्तांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा गर्भीत इशारा युवा स्वाभिमान पक्षाने विभागीय आयुक्तांना दिला आहे. या कार्यकर्त्यांनी सोमवारी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.१३ मार्चला युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांची खुर्ची उड्डाणपुलाला टांगली होती. त्याच दिवशी आयुक्त हेमंत पवार हे १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. असे असताना पवार यांनी रविवारी दोन खासगी कार्यक्रमात सहभाग घेतला. सांस्कृतिक भवनातील ‘पाडवा पहाट’मध्ये त्यांनी गीत गायिले. सायंकाळी एका मराठी अभिनेत्रीसोबत स्टेज शेअर केला. या बाबींवर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यानी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत.खुर्चीत बसू देणार नाही!वैद्यकीय रजेवर असताना अन्य अधिकाऱ्यांना यवतमाळ मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र मागितले जाते, तर हेमंत पवारांसाठी वेगळा नियम आहे का? जर ते गाणे गाऊन लोकांचे मनोरंजन करत असतील तर त्यांच्या वैद्यकीय रजा खोटी नव्हे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. सुटीवर मनोरंजन करीत असतानाच, सर्वसामान्यांचे काम सोडून ते घरी फाइल बोलावून ठेकेदारांची बिले मंजूर करीत असल्याचा आरोप युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक कामांत मोठा भ्रष्टाचार झाला. त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महावितरणने शहराचा वीजपुरवठा कापला होता. अशा अयशस्वी आयुक्तांचा युवा स्वाभिमान निषेध करीत असून, त्यांनी आता शहरातील सर्वसामान्यांची कामे करावी, अन्यथा त्यांना खुर्चीत बसू दिले जाणार नाही, असा संतप्त इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शहर उपाध्यक्ष अभिजित देशमुख, अंकुश ठाकरे, रौनक किटुकले, मंगेश कोकाटे, अमर काळमेघ, पलाश रायबोले, आदींची उपस्थिती होती.मनीषा म्हैसकर पाठवतील का मेडिकल बोर्डाकडे?एखाद्या अधिकारी, कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय रजेबाबत प्रशासकीय प्रमुखांना शंका वाटत असेल, तर संबंधिताना मेडिकल बोर्डाकडे पाठविले जाते. संबंधित अधिकारी कर्मचारी खरोखर आजारी होता की कसे, याची खातरजमा करून मेडिकल बोर्डाकडून अहवाल दिला जातो. मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे व पशू शल्यचिकित्सक दिवंगत सुधीर गावंडे यांना तसे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. त्या धर्तीवर नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर या आयुक्त हेमंत पवार यांना रुजू करून घेताना मेडिकल सर्टिफिकेट मागतील का की पवारांसाठी वेगळे नियम आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.पवारांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडेमहापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या कार्यकाळाची चौक शी करावी. तद्वतच आ. रवि राणा हेसुद्धा पवारांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करुन चौकशीची मागणी करणार आहेत, असे युवा स्वाभिमान पक्षाने विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. स्मार्ट सिटी, पीएम आवास योजना अशा कुठल्याही योजना कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. दोन वर्षांत पवारांनी एकही ठसठशीत काम केलेले नाही. त्यांना विकासकामाचे व्हिजन नसल्याचा आरोपही युवा स्वाभिमानने केला आहे.अन्य कुणाला पदभार देण्याबाबत शासनादेश नसल्याने काम सुरूच ठेवले आहे. अर्थसंकल्प व मार्चएंडची महत्त्वपूर्ण कामे करीतच आहे. युवा स्वाभिमानने केलेले आरोप तथ्यहीन आहेत.- हेमंत पवार,आयुक्त, महापालिका