शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

हॅलोऽऽऽ अमरावती कारागृह ‘गूड मॉर्निंग’

By admin | Updated: April 15, 2016 00:06 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात रेडिओ सुविधेला सुरूवात झाली आहे. त्याकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून ....

गणेश वासनिक अमरावतीयेथील मध्यवर्ती कारागृहात रेडिओ सुविधेला सुरूवात झाली आहे. त्याकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून बंदीजनांची सकाळ आता ‘हॅलो...अमरावती कारागृह’ या स्वराने होत आहे. दुपारी १२ ते ३ वाजताच्या दरम्यान ‘कैद्यांची फरमाईश’ हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने कैद्यांना चांगला विरंगुळा मिळत आहे.नकळत झालेल्या चुकांची शिक्षा पाषाण भिंतींच्या आड भोगणाऱ्या कैद्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, यासाठी कारागृह प्रशासनाच्यावतीने सुधारणा व पुनर्वसनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमिवर १ जानेवारीपासून अमरावती मध्यवर्ती कारागृहात रेडिओ सुविधा सुरू झाली आहे. भक्तीगीतांची बंद्यांची फरमाईशअमरावती : चार भिंतीच्या आत देश, विदेशातील घडामोडींची माहिती बंद्यांना मिळावी, याकरीता दैनंदिन पेपर वाचन अंतर्गत सकाळी ८.३० ते ९ वाजेदरम्यान वृत्तपत्रांचे वाचन केले जाते. यात महत्त्वाच्या घडामोडींसह राज्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक बातम्यांचे प्रसारण केले जाते. सकाळी ७ वाजतापासून सुरु झालेले रेडिओवरील कार्यक्रम दुपारी ३ वाजेपर्यंत पुरुष व महिला कैदी श्रवण करतात. कारागृहातील १६ बराकींमधील कैद्यांना रेडिओवरील कार्यक्रम श्रवण करता यावेत यासाठी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदीजनांच्या मनात काही वेळा नैराश्याची भावना निर्माण होेते.कायद्याचे उल्लंघन करण्याचे विचार मनात घर करू लागतात त्यामुळे रेडिओवरून श्रवणीय कार्यक्रम प्रसारित केल्यास त्यांचे मतपरिवर्तन होऊ शकते, असे कारागृह अधीक्षक जयंत नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रेडिओवर सुरु असलेल्या विविध कार्यक्रमांमधून बंदीजनांचे मतपरिवर्तन करण्यास मदत मिळत असल्याचा दावा कारागृहाने केला आहे. कारागृहात विविध जाती, धर्माचे कैदी आहेत. त्यामुळे भक्तिगीते, भजन, कव्वाली, भीम-बुद्ध गीते, कीर्तन अशा विविध गीतांचे प्रसारण रेडिओवरून केले जाते. रेडिओकेंद्र हाताळण्याची जबाबदारी सुदर्शन विघ्ने नामक कैदी यशस्वीपणे हाताळत आहे. २कारागृहाचे अंतर्गत सुरक्षा अधिकारी प्रशांत नागवाडे व प्रशिक्षक प्रशांत कांबळे यांच्याकडे रेडिओ केंद्राची देखभाल व्यवस्था सोपविली आहे. बंदीजनांना थोर-महात्म्यांच्या विचारांची जाण व्हावी, यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेंतर्गत तज्ज्ञ, अभ्यासू व्यक्तिंची व्याख्याने आयोजित करुन रेडिओमार्फत ती कैद्यांपर्यंत पोहोचविली जातात. रेडिओ जॉकी, रेडिओ मिर्ची, रेडिओ एसीपी अशा अन्य नावाने कार्यक्रम राबवून बंदीजनांचे मतपरिवर्तन करण्यासाठी रेडिओकेंद्र कारागृहासाठी लाभदायी ठरु लागले आहे.प्रत्येक बराकीत लावले बॉक्समध्यवर्ती कारागृहातील १६ बराकीत बंदीजनांना आवडीचे गाणे ऐकता यावे, यासाठी ‘हॅलो फरमाईश’ या कार्यक्रमातून गाण्यांचा आस्वाद घेता येतो. मात्र, फरमाईशचे गाणे ऐकण्याकरीता बंद्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक बराकीत बॉक्स लावण्यात आले आहेत. ‘हॅलो फरमाईश’ हा कार्यक्रम दुपारी १२ ते ३ वाजतादरम्यान प्रसारित केला जातो. त्यामुळे बंद्यांना सकाळी ९ वाजतापूर्वीच गाण्याची यादी बॉक्समध्ये टाकावी लागते. त्यानंतर बंद्यांनी फरमाईश केलेली गाणी इंटरनेटवरून डाऊनलोड केली जातात. ‘हॅलो फरमाईश’ या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर यांनी दिली.