शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सावरखेड येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:24 IST

तालुक्यातील सावरखेड येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : सोफियाचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील सावरखेड येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा, अन्यथा ठाणाठुणी येथून सोफियाला पाणीपुरवठा करणारी पाइप लाइन फोडू, असा इशारा युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख विपीन ढोंगे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला.सावरखेड येथे मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. शाळकरी विद्यार्थ्यांना व महिलांना दुरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. आता तर उन्हाळ्याच्या दिवसात गुराढोरांना पाण्याचा थेंब मिळेनासा झाला आहे. गावातील शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत केलेल्या दोन विहिरीदेखील आटल्या. जुने व नवीन केलेले बोअर ड्राय झाले. पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येविषयी ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेक निवेदने दिली. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सावरखेड गाव ७० गाव पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट आहे. शासनाने ही योजना सुरू करावी. येत्या १५ दिवसांत पाणीटंचाई कायमस्वरूपी निकाली न काढल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा विपीन ढोंगे, न.प. बांधकाम सभापती रवींद्र गुल्हाने, महिला व बाल कल्याण सभापती क्रांती चौधरी (धावडे), भूषण राऊत, अंकुश राऊत, दर्शन म्हाला, शुभम पाचघरे, अंकुश फरकाडे, अशफाक शाह, रवींद्र मनोहरे, रामभाऊजी साबळे, गजानन भुंबर, श्याम जोमदे, संजय टारपे, नीलेश टारपे, श्रीधरराव सोलव, विजय ठाकूर, शिवाजी भुंबर, अभिजीत साउत, भैयासाहेब काळबांडे, प्रतीम देऊळकर, राजाभाऊ काजळकर, कुलदीप मोहोड, शशिकांत भुंबर आदी ग्रामस्थांनी दिला.गोराळा पिंगळाई येथील विहिरीतून पाइप लाइनने गावातील एका विहिरीत पाणी टाकून, ते पाणी ग्रामपंचायतीच्या टाकीत नेऊन तेथून गावाला पाणीपुरवठा होत होता. परंतु, आता त्या विहिरीलासुद्धा पाणी राहिले नसल्यामुळे तेथून होणारा पाणीपुरवठा बंद झाला. गावातील हापस्या दुरुस्त केल्यास समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.