शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक बचाव आंदोलन

By admin | Updated: April 14, 2016 00:16 IST

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पदाला मान्यता देताना विद्यार्थी पटसंख्येचा निकष लागू केला आहे.

अमरावती : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पदाला मान्यता देताना विद्यार्थी पटसंख्येचा निकष लागू केला आहे. हे निकष मुख्याध्यापक पदांसाठी अन्यायकारक असून ही जाचक अट रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी शिक्षण संघर्ष समितीच्या वतीने मुख्याध्यापक बचाव आंदोलन करण्यात आले.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात विभागातील शिक्षक, मुख्याध्यापकांनी आर्वजून हजेरी लावली होती. आंदोलनात बहुसंख्येने शिक्षकवृंद उपस्थित होते. आंंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके, माजी आ. सुलभा खोडके यांनी उपस्थिती लक्षणीय होती. मुख्याध्यापक बचाव आंदोलनातून शासनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले. मुख्याध्यापक पदाला मान्यता देताना विद्यार्थी पटसंख्येचा निकष रद्द करुन शाळा तेथे मुख्याध्यापक ही संरचना कायम ठेवण्यात यावी, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना वर्ग ५ ते ८ उघडण्याची परवानगी देऊ नये, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानीत आदी सर्व शाळा सुरु करणे अशा विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले. आंदोलनाप्रसंगी विकास दवे, शरद तिरमारे, ललित चौधरी, प्रदीप नानोटे, नीलय बोंडे, संजय बुरघाटे, सागर वाघमारे, आशिष विधाते, शेख बशीर, सुरेश मोलके, नितीन तायडे, मनोज कडू, प्रवीण गुल्हाने, अशोक अवघड, पी. एन. घरडे, जे.एच. यावलीकर, एस. एस. घोडेराव, एस.जी. विखे, मीरा मिटकरी, राजाभाऊ काळे, संदीप बाजारे आदी शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठविण्यात आले आहे.