शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘त्याने’ केला होता बलात्काराचाही प्रयत्न !

By admin | Updated: March 17, 2016 00:16 IST

युवा स्वाभिमान संघटना व चैतन्य कॉलनीतील काही युवकांनी नियोजनबध्द पध्दतीने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मुळे अश्लील चाळेखोर दुकानदाराचे बिंग फुटले.

लैंगिक छळ : स्टिंग आॅपरेशनमुळे फुटले बिंगअमरावती : युवा स्वाभिमान संघटना व चैतन्य कॉलनीतील काही युवकांनी नियोजनबध्द पध्दतीने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मुळे अश्लील चाळेखोर दुकानदाराचे बिंग फुटले. चैतन्य कॉलनीतील ‘ओम कलेक्शन अ‍ॅन्ड स्टेशनरी’चा संचालक मोहन गाडगे हा १२ वर्षिय मुलीशी अश्लिल चाळे करताना व्हिडिओ क्लिपमध्ये आढळून आल्याने महिलांसह नागरिकांनी मंगळवारी त्याला बेदम चोप दिला होता. आरोपीने काही दिवसांपूर्वी बालिकेवर बलात्काराचासुध्दा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. आ. राणा यांना प्राप्त झालेल्या निनावी पत्रामध्ये मोहन गाडगे हा दुकानदार दुकानात येणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करीत असल्याचा उल्लेख होता. गंभीर प्रकाराची दखल घेऊन युवा स्वाभिमानी संघटनेचे विनोद गुहे यांच्या मार्गदर्शनात चैतन्य कॉलनी परिसरातील काही युवकांनी मोहन गाडगेकडे लक्ष केंद्रित केले होते.चॉकलेट, पैशांचे दिले आमिष पीडित बालिकेचे आई-वडील गवंडी काम करून उदरनिर्वाह करतात. गरिबीमुळे पैसे उपलब्ध होतील त्यानुसार छोट्या-छोट्या वस्तुंसाठी तिला या दुकानात जावे लागत होते. याचाच फायदा उचलून मोहन गाडगे याने तिला चॉकलेट व पैशांचे आमिष दिले होते. त्या मोबदल्यात तो तिच्यासोबत अश्लिल चाळे करीत होता. पीडितेच्या बयाणातून ही बाब उघड झाली. त्यातच गाडगे याने काही दिवसांपूर्वी या बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न सुध्दा केल्याचे उघड झाले आहे. आरोपी लैंगिक चाळे करीत होता तसचे त्याने बलात्काराचा प्रयत्न देखील केला असे पीडित बालिकेने तक्रारीत म्हटले आहे. लैंगिक चाळ्यांचा प्रकार कॅॅॅमेऱ्यात स्पष्टपणे आढळून आल्यास तो महत्त्वाचा पुरावा समजला जाईल. त्या पुराव्यावरूनच आरोपीचा गुन्हा सिध्द होऊ शकतो. तसेच त्याला शिक्षा सुध्दा होऊ शकते. - रियाजुद्दीन देशमुख, सहायक पोलीस आयुक्त.