शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची प्रकरणे जलदगतीने हाताळा

By admin | Updated: June 5, 2014 23:42 IST

जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर व तत्सम प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी दाखल प्रकरणे तीन ते चार दिवसांत निकाली काढा, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी तालुक्यातील सेतू केंद्रांना दिले.

अंजनगाव सुर्जी : जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर व तत्सम प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी दाखल प्रकरणे तीन ते चार दिवसांत निकाली काढा, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी तालुक्यातील सेतू केंद्रांना दिले. बारावीचा निकाल लागला असून दहावीचाही निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात झुंबड सुरू होते. प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी उसळणार आहे. त्यामुळे अशी प्रकरणे सेतू केंद्र धारकांनी व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने हाताळावीत, अशी सूचना उपविभागीय अधिकारी सोहम वाचाळ यांनी सेतू केंद्रधारकांना दिली. यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सेतू केंद्र धारकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी वाचाळ पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रकरणे हाताळण्यात दिरंगाई झाल्यास पुन्हा नव्याने प्रकरणे सादर करावी. परंतु कोणत्याही प्रकरणास चार दिवसांपेक्षा अधिक उशीर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सेतू केंद्रांच्या कार्यप्रणालीत पादर्शकता बाळगण्यात  यावी. सर्व सेतू केंद्रांनी आपल्या कामाच्या स्वरूपाचे भावफलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावेत. कागदपत्रांची मांडणी व्यवस्थित ठेवावी. जात प्रमाणपत्रासाठी आधी मुलाचे, नंतर वडिलाचे, शेवटी आजोबांचे व त्यानंतर महसुली पुरावे जोडण्यात यावेत. सर्व प्रकरणांत नियमानुसारच शुल्क आकारणी करावी. केंद्रात आलेल्या ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही उपविभागीय अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.यावेळी सेतू केंद्र धारकांच्यावतीनेही अडचणी मांडण्यात आल्या. केंद्रावर वाढलेल्या गर्दीमुळे ओळखपत्र आदी कागदपत्रांची शहानिशा करणे, हे कठीण काम ठरते. अनेक ग्राहक स्वत:चे ओळखपत्र न आणता प्रतिज्ञापत्र देण्याचा हट्ट करतात. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तिंना असे प्रमाणपत्र द्यावे लागते. वेगवेगळ्या सेतू केंद्रात वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत असल्याचा आरोप  यावेळी सेतू केंद्र संचालकांकडून नाकारण्यात आला. यावर्षीपासून विद्यार्थ्यांंना वेळेत प्रमाणपत्र मिळतील