शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी-पोहरा जंगलात सोलर ऊर्जेवर हातपंप

By admin | Updated: March 16, 2017 00:04 IST

शहरानजीकच्या वडाळी- पोहरा जंगलात वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यात आले आहेत.

अभिनव उपक्रम : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभाग सरसावलाअमरावती : शहरानजीकच्या वडाळी- पोहरा जंगलात वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यात आले आहेत. त्याकरीता पाच लाख रूपये खर्च करण्यात आला असून जंगलात पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. परिणामी उन्हाळ्यात वन्यपशुंसमोर उद्भवणाऱ्या पाणीप्रश्नावर मात करण्यात वनविभागाला यश आले आहे.सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यान्वित असून या सोलरपंपामुळे वन्यपशुंंच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. वडाळी-पोहरा जंगलात वाघ, बिबट, हरिण, रानडुक्कर, वाघ, चितळ, माकड आदी वन्यपशुंसह पक्ष्यांची मोठी संख्या आहे. मात्र, वडाळी-पोहरा जंंगलात पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे वन्यपशुंना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागते. सध्या जेमतेम उन्हाळा सुरु झाला असतानाही जंगलातील पाणवठे पाणी आटू लागले आहेत. त्यामुळे वडाळी जंगलातील भवानी तलाव परिसर, पोहरा, चिरोडी याभागात हातपंप आणि सोलरपंप बसविण्यात आले आहेत. पोहरा, चिरोडी व वडाळी भागात वन्यपशुंची मोठी वर्दळ राहात असल्यामुळे ही जागा वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी हातपंप बसविण्यासाठी निवडण्यात आली आहे. हे सोलरपंप स्वयंचलित असून सूर्यप्रकाश असेपर्यंत हातपंपाद्वारे पाणी सुरु राहते. वन्यपशुंसाठी नव्याने पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सोलरपंपाद्वारे हातपंपातून पाणी पाणवठ्यात सोडण्याचीे व्यवस्था करण्यात आली आहे. सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यासाठी वन्यजीव संरक्षणांतर्गत पाणवठे तयार करण्यासाठी प्राप्त निधीतून पाच लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. वडाळी-पोहरा जंगलात सोलर ऊर्जेच्या हातपंपाचा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य ठिकाणी हातपंप बसविले जाणार आहेत. यापूर्वी पोहरा-चिरोडी जंगलात हातपंप बसविण्यात आले आहेत. उन्हाळ्यात वन्यपशुंची पाण्यासाठी होणारी वणवण यामुळे थांबणार आहे.स्वयंचलित आहे हातपंपवडाळी जंगलात सोलर ऊर्जेवर बसविले जाणारे हातपंप स्वयंचलित राहणार आहेत. त्यानुसार वनविभागाने निविदा देखील काढल्या होत्या. नामांकित कंपनीचे सोलर पंप असून हातपंपाचा दर्जा चांगला आहे. या पंपांची किमान दोन ते तीन वर्षांची वॉरंटी आहे. यानव्या प्रयोगामुळे वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी कर्मचाऱ्यांवर येणारा ताण देखील कमी झाला आहे.एक सोलर सेट आणि हातपंप बसविण्यात आला आहे. वन्यपशू संरक्षणांतर्गत पाणवठे तयार करण्यासाठी प्राप्त निधीतून सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले आहेत. पोहरा येथे नव्याने प्रस्तावित आहे.- विनोद कोहळे, वनपाल, पोहरा