शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

कंटेनरमधून दीड लाखांचे पार्सल लंपास

By admin | Updated: December 2, 2015 00:08 IST

पनवेलहून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरमधून २८ नोव्हेंबरला अकोला नाका परिसरातून दीड लाख रुपये किमतीचे पार्सल चोरीला गेले.

तक्रार : पनवेलहून नागपूरकडे जात होता मालबडनेरा : पनवेलहून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरमधून २८ नोव्हेंबरला अकोला नाका परिसरातून दीड लाख रुपये किमतीचे पार्सल चोरीला गेले. मात्र, याबाबत बडनेरा व लोणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या चालकाला हुसकावून लावण्यात आले. त्याने वरिष्ठांकडे दाद मागितल्यानंतर ३० नोव्हेंबरला बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत. लालबहाद्दूर गंगाधर पाल (२५, रा. डगडपूर, उत्तर प्रदेश) असे फिर्यादी कंटेनरचालकाचे नाव आहे. २५ नोव्हेंबरला एम.एच.१४-बी.जे. २६५० या कंटेनरमधून चालक १ लाख रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या पार्सल्स घेऊन मुंबईमधील पनवेलहून नागपूरकडे रवाना झाला. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला नाक्यावर तो २६ नोव्हेंबरच्या रात्री १ वाजता जेवण करण्यासाठी थांबला असताना ट्रकमधील संगणक, कपड्याचे गठ्ठे, फ्रीज, वॉशिंग मशीन व इतर साहित्याच्या पार्सल्ससह १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. या घटनेची तक्रार त्याने बडनेरा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.