शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट

By admin | Updated: May 12, 2015 00:15 IST

विदर्भातील वातावरण बदलामुळे काही ठिकाणी मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट व ११ ते १५ मे दरम्यान तुरळक ...

हवामान तज्ज्ञांचा अंदाज ११ ते १५ मे दरम्यान वातावरणात बदल अमरावती : विदर्भातील वातावरण बदलामुळे काही ठिकाणी मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट व ११ ते १५ मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. भर उन्हाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे जनतेची चिंताही वाढली आहे. अफगाणिस्थानच्या आसपासच्या भागावर चक्राकार वारे वाहात असून मध्य प्रदेश, तामिळनाडू ते विदर्भावर कमी दाबाची द्रोणिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हरियाणा, गांगेय, पश्चिम बंगाल, मलय बेटाच्या १५०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पावसासाठी अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मध्यभारतात कमाल तापमान २ ते ३ डिग्री सेल्सीअसने कमी होणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा जोर वाढला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह शहरवासियांनाही हैराण केले होते. त्यातच पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)सद्यस्थितीत वातावरण पावसासाठी अनुकूल आहे. त्यामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. ११ ते १५ मे दरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळू शकतो. काही ठिकाणी गारपीटही संभवते. यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. - अनिल बंड, हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.