शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

गुडेवारच ‘अमृत’चे कर्तेकरविते

By admin | Updated: December 31, 2016 01:26 IST

निविदा प्रक्रिया न राबविता आणि किमान वेतन कायद्याला हरताळ फासत सुरक्षा रक्षकाचा कंत्राट ‘अमृत’ला देण्यात आला.

सुनील देशमुखांचा आरोप : महापालिकेत आढावा बैठक अमरावती : निविदा प्रक्रिया न राबविता आणि किमान वेतन कायद्याला हरताळ फासत सुरक्षा रक्षकाचा कंत्राट ‘अमृत’ला देण्यात आला. यात विद्यमान यंत्रणा दोषी नसून या प्रशासकीय अनियमिततेचे गुडेवारच कर्तेकरविते असल्याचा आरोप आ. सुनील देशमुख यांनी शुक्रवारी केला. आ.सुनील देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी महापालिका सभागृहात नगरोत्थान योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेचा दाखला देत आयुक्तांकडून ‘अमृत’बद्दल जाणून घेतले. मे २०१६ मध्ये अमृत या संस्थेशी करारनामा करताना काही गोष्टी चुकल्यात, असे आयुक्त हेमंत पवार यांनी स्पष्ट केले. जगदंबा ही संस्था ‘ब्लॅकलिस्ट’ केल्यानंतर सुरक्षा रक्षकांमधीलच काहींना एकत्र आणून गुडेवारांच्या पुढाकाराने ‘अमृत’ची स्थापना करण्यात आली, असे आयुक्तांनी सांगताच देशमुख कमालीचे संतापले. त्यांचा तोल ढळला. आणि त्यांनी आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले. तथापि अमृतच्या मुळ मुद्द्याला निर्णायक वळण मिळाले नाही. -तर गुडेवारांची पूजा करा! गुडेवारांनी शहराचा सत्यानाश केला. मात्र जसे मोदीभक्त आहेत. तसेच काही गुडेवारभक्त सुद्धा असल्याची टीका सुनील देशमुखांनी केली. गुडेवारांचे फोटो घरी लावा, त्यांची पुजा करा, मात्र ‘सिलेक्टेड’ होऊ नका, असा सल्ला देशमुखांनी दिला. पीएम आवास योजनेचा त्यांनी कसा बट्ट्याबोळ केला, हे आपण पाहतच आहोत, अशी टिप्पणी करुन देशमुखांनी गुडेवारांप्रतीची भावना व्यक्त केली.