शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पांदण रस्त्याचा अमरावती पॅटर्न देशासाठी 'रोल मॉडेल'

By admin | Updated: June 29, 2016 00:16 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी लोकसहभागातून जिल्ह्यात यशस्वी करून दाखविलेल्या पालकमंत्री पांदण रस्ते विकास योजनेचा अमरावती पॅटर्न संपूर्ण देशासाठी 'रोल मॉडेल' ठरावा...

पीयूष गोयल : दाभा येथील पांदण रस्त्यांची पाहणीअमरावती : जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी लोकसहभागातून जिल्ह्यात यशस्वी करून दाखविलेल्या पालकमंत्री पांदण रस्ते विकास योजनेचा अमरावती पॅटर्न संपूर्ण देशासाठी 'रोल मॉडेल' ठरावा, असा आहे. अन्य राज्यांनीसुद्धा या पांदण रस्ते विकासाचा अमरावती पॅटर्न राबविल्यास शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटतील, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी केले.जिल्ह्याच्या दौऱ्यातील टिमटाळा येथून परत येत असताना त्यांनी दाभा शेतशिवरात जाऊन पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियानातून साकारण्यात आलेल्या पांदण रस्त्यांची पहाणी केली. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून या योजनेबद्दल त्यांनी प्रवासात माहिती घेतली होती. प्रत्यक्ष शेतात जाऊन पांदण रस्ते पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना दाभा येथील पांदण रस्ते दाखविण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा या गावातील अतिक्रमित रस्ते पूर्णपणे मुक्त झाले असून संपूर्ण पांदण रस्तेच पालकमंत्री पांदन रस्ते विकास योजनेंतर्गत तयार करण्यात आले आहे. पांदण रस्त्यांची पाहणी करताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या कल्पकतेची प्रशंसा करताना म्हणाले की, लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करता येऊ शकते, हे आपण पहिल्यांदाच येथे पाहत आहे. शेतात जाणारे रस्ते हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून पांदण रस्त्यांचा अमरावती पॅटर्न हा देशासाठी रोल मॉडेल ठरावा, असा आहे. महाराष्ट्रात पालकमंत्री पांदण रस्ते विकास योजना सुरू करण्यात आली. त्याप्रमाणे अन्य राज्यांसाठी हा पॅटर्न अनुकरण करावा असाच आहे, असे गोयल म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून विविध बांबीवर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, तलाठी विनोद पिंजरकर, मंडल अधिकारी आशिष नागरे तहलसीलदार वाहुवाघ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.