शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीची उत्तम वेळ, घरे महागणार !

By admin | Updated: May 25, 2017 00:07 IST

नोटबंदीनंतर आलेली मंदी हाच ग्राहकांसाठी घरे खरेदीचा उत्तम काळ असून येणाऱ्या काही दिवसांत घराच्या किमती महागणार असल्याचा सूर....

लोकमतचा उपक्रम : बिल्डर्स असोसिएशन-क्रेडाईने केले ‘रेरा’चे स्वागतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटबंदीनंतर आलेली मंदी हाच ग्राहकांसाठी घरे खरेदीचा उत्तम काळ असून येणाऱ्या काही दिवसांत घराच्या किमती महागणार असल्याचा सूर बिल्डर्स असोसिएशन क्रेडाई अमरावतीच्या चर्चेतून उमटला. ‘लोकमत’ने रिअल इस्टेट (रेग्युलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) अ‍ॅक्ट (रेरा)च्या अनुषंगाने येथील ‘लोकमत’ भवनात ही सांघिक चर्चा आयोजित केली होती. ग्राहक आणि बांधकाम व्यवसायिक यांच्या हितार्थ केंद्र शासनाने १ मे २०१७ पासून ‘रेरा’ लागू केला. या चर्चासत्रादरम्यान बिल्डर्स असोसिएशन-क्रेडाई अमरावतीने या कायद्याचे मनापासून स्वागत केले. बांधकाम व्यवसायात गुणवत्ता, दर्जा आणि वचनबद्धता याच मिलाफाला आता थारा मिळेल. बिल्डर्सच्या नावावर सामान्यांची फसवणूक करणाऱ्या चकटफूं ना चाप बसणार असल्याची अपेक्षा बांधकाम व्यवसायिकांनी व्यक्त केली. बिल्डर्स असोसिएशन-क्रेडाई अमरावतीचे सर्व सदस्य नियमितपणे दर्जा आणि गुणवत्तेचे पालन करीत आले आहेत. लोकांच्या स्वप्नातील घरे बांधून देण्याच्या व्यवसायाशी आम्ही संबंधित आहोत. आमच्यासाठी प्रॉडक्ट असलेले घर सामान्यांसाठी हृदयस्थ विषय असतो याची आम्हाला जाण आहे. अवघ्या आयुष्याची कमाई गुंतवून घर खरेदी केले जाते. हे आम्ही जाणतो. ग्राहकांना म्हणूनच सेवा, दर्जा आणि विश्वसनीयता प्रदान करणे यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो; तथापि ग्राहकांच्या याच भावनिकतेचा फसवणुकीसाठी वापर करणाऱ्या काही व्यवसायिकांनी अलिकडे डोके वर काढले होते. अशा काही संधीसाधू व्यावसायिकांमुळे अवघा बांधकाम व्यवसाय संशयाच्या भोवऱ्यात अडकला होता. खऱ्या खोट्याची जाण चिकित्सक ग्राहकांना असली तरी बांधकामाबाबतचे नियम माहिती नसलेले भोळे ग्राहक संधीसाधू व्यावसायिकांच्या फसवणुकीला बळी पडत होते. ‘रेरा’मुळे आता बांधकाम व्यवसायात शुद्धता येणार आहे. ग्राहकांना संरक्षण मिळणार आहे. बांधकाम व्यवसायाशी ज्याची प्रामाणिकता जुळली आहे, ग्राहक हा ज्यांच्यासाठी केंद्रबिंदू आहे, अशीच मंडळी या व्यवसायात टिकू शकणार आहे. वाढू शकणार आहे, अशा भावना बिल्डर्स असोसिएशन-क्रेडाई अमरावतीने चर्चेदरम्यान व्यक्त के ल्यात.