शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित महाविद्यालयांना मिळणार अनुदान

By admin | Updated: July 23, 2014 23:23 IST

राज्यभरातील कायम विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेणार असल्याच्या प्रयत्नात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

शासन निर्णय : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला मागितली माहितीअमरावती : राज्यभरातील कायम विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेणार असल्याच्या प्रयत्नात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन संस्था चालकांना खूश करण्यासाठी हा खटाटोप असल्याचे बोलले जात आहे. मात्र राज्य शासनाच्या निर्देशानंतर विद्यापीठ प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे सध्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह सर्वच विद्यापीठांमध्ये वाद सुरू आहे. विशेषत: पारंपरिक कोर्सेसच्या महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क अत्यल्प असल्याने नियमित प्राध्यापक नियुक्त करण्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या स्थितीत शैक्षणिक गुणवत्तादेखील राखता येत नाही. अमरावती विद्यापीठात गेल्या वर्षभरापासून कायम विना अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त पदामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे परीक्षा रोखण्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली होती तर दुसरीकडे राज्य शासनाने अनुदान दिल्यास नियमित प्राध्यापक नियुक्त करण्यास महाविद्यालय तयार आहेत, अशी भूमिका संस्था चालकांनी मागील महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत मांडली होती. त्यानंतर राज्यभरातील सहसंचालकांनी अनुदानित कायम अनुदानित महाविद्यालयामधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबत आढावा घेण्यास सांगितले होते. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची आर्थिक स्थिती बघता तिथे पूर्णकालीन प्राध्यापक नियुक्त करणे अशक्य असल्याचा अभिप्राय सादर झाला होता. २७ जून रोजी पुणे येथील संचालनालयात राज्यातील सर्व सहसंचालकांची बैठक पार पडली. यात महाविद्यालयांतील कामाचा ताण बघता प्राध्यापकांची आवश्यकता संभाव्य आर्थिक खर्चाची माहिती मागविण्यात आली. दरम्यान राज्य शासनाने २५ नोव्हेंबर २००१ ते २०१४ या कालावधीतील मंजूर झालेल्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान विद्याशाखेतील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्याचे प्रारूप धोरण आखले आहे. त्यामुळे सुमारे २ ते ३ हजार महाविद्यालयांना अनुदान मिळण्याची शक्यता आहे.