मदत : कुटुंंबातील पाच सदस्यांना दोन लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षणअमरावती : आता महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. उंच इमारतीचे बांधकाम होत असताना कंत्राटदार अथवा मालकांकडून कामगारांच्या सुरक्षिततेची म्हणावी, तशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे बांधकाम करत असताना उंचावरुन पडून कामगार जखमी वा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु या कामगारांची संघटना नसल्यामुळे अशा घटना कोणतीही चर्चा न होताच मागे पडताना दिसत आहे. त्यातच कामावर असताना अपघात होऊन कामगार जमखी वा मृत्यू पावल्यास शासनाकडून कोणती मदत मिळते हेही बहुतांश कामगारांना माहीत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी बांधकाम कामगाराने अथवा बांधकाम मालक किंवा कार्यालयात कामगारांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. या नोंदणीसाठी कामगारांचा रहिवासी दाखला, वयाचा दाखला, वारसाचे नाव व पत्ता, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, मागील वर्षांमध्ये ९० दिवस काम केल्याचे व्यावसायिक अथवा बांधकाम मालकाचे प्रमाणपत्र व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नोंदणी शुल्क म्हणून २५ रुपये व मासिक वर्गणी ६० रुपये भरावी लागणार आहे. या मंडळाकडे नोंदणी झालेल्या बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास मंडळाकडून आयविधीसाठी ५ हजार रुपये व त्यांच्या वारसदारांना २ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिल्या जाते. त्याचप्रमाणे ५ वर्षांपर्यंत प्रती वार्षिक १२ हजार रुपये दिल्या जातात. मंडळाकडे नोंदणी झाल्यानंतर बांधकाम कामगारास स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी १० हजार रुपयांचे अनुदान दिल्या जाते. तर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे २५ हजार रुपयांची मुदत बंद ठेव १८ वर्षांपर्यंत ठेवल्या जाते. परंतु अशा घटनांची कोणतेही चर्चा होत नाही. तसेच यासंदर्भात शासनाकडून कोणतीही मदत मिहते. याची बहुतांश कामगारांना माहिती नसते. जागृती होणे आवश्यक आहे.बांधकाम कामगारांना सुरक्षतेची हमीबांधकाम करताना सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केल्यास कामगारांना अती सुरक्षीत राहण्याची हमी मिळते. परंतु त्यासाठी कामगारांना हेल्मेट, हॅड ग्लोव्हत, सुरक्षा बुट व सुरक्षा बेल्टची आग्रही मागणी संबंधित कंत्राटदाराडे करणे आवश्यक आहे. त्यांचा हक्क आहे. प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्यमंडळाकडे नोंदीत बांधकाम महिला कामगारास तसेच पुरुष बांधकाम कामगाराच्या पत्नीस नैसर्गिक प्रसूतीसाठी १० हजार रुपये मात्र शस्त्रक्रियेव्दारे प्रसूती झाल्यास १५ हजार रुपये दिल्या जातात. नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना दोन लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण तर ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व झाल्यास १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळते.
बांधकाम कामगारांना लग्नासाठी अनुदान
By admin | Updated: May 24, 2015 00:31 IST