शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नातवानेच केला आजीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST

मोबाईल विकत घेण्यासाठी सोन्याची पोत चोरली : अंत्यसंस्कारातून मिळाला सुगावा, २४ तासात उलगडा ब्राह्मणवाडा थडी : येथील ७५ वर्षीय ...

मोबाईल विकत घेण्यासाठी सोन्याची पोत चोरली : अंत्यसंस्कारातून मिळाला सुगावा, २४ तासात उलगडा

ब्राह्मणवाडा थडी : येथील ७५ वर्षीय वृद्धेचा तिच्या नातवानेच खून केल्याचा उलगडा पोलीस तपासात झाला आहे. साध्या वेशातील पोलीस त्या वृद्धेच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. त्यातील चर्चेनुसार, पोलिसांनी आरोपी नातवाला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. सुरज प्रल्हाद अमझरे (२९, रा. भोईपुरा, ब्राह्मणवाडा थडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी त्याला अटक करण्यात आली.

८ जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ७५ वर्षीय गिरीजा आण्याजी अमझरे या वृद्धेचा खून झाला. तर, महिलेच्या गळ्यातील पोत गहाळ असल्याचे पंचनाम्यादरम्यान सांगण्यात आले. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असावा, या शक्यतेने पोलिसांनी चौकशी तथा तपासाला वेेग दिला.

सकाळी दहा वाजता दरम्यान राहत्या घरी खून झाल्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी यांनी एलसीबी व स्थानिक पोलिसांना आरोपीचा शोध लावून अटक करण्याचे आदेश दिले होते. यानुसार स्थानिक पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक वळवी, पीएसआय संजय शिंदे, त्र्यंबक सोळुंके, कैलास खेडकर यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला शुक्रवारी दुपारी अटक केली. आरोपीकडून मृत महिलेच्या गळ्यातील चोरी गेलेली सोन्याची पोत व खून करण्यासाठी वापरलेला सराटा ताब्यात घेतला. आरोपीने सोन्याची पोत ही पाणीपुरवठ्याच्या विहिरी शेजारील दगडाखाली लपवून ठेवली होती. तर खून करण्यासाठी वापरलेला सराटा हा घराबाजूनी असलेल्या लेआउटमधील नालीत फेकून दिला होता.

असा झाला उलगडा

आरोपी हा मयत आजीच्या अंत्यसंस्कारामधून घरी आल्यानंतर तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून घरामध्ये झोपून राहिला. पीएसआय शिंदे व त्यांचे सहकारी कैलास खेडकर, त्र्यंबक सोळुंके हे अंत्यसंस्कारात साध्या गणवेशात सामील झाले होते. पीएसआय शिंदे यांनी तर मृत महिलेचे पतीला छत्रीचा सहारा दिला. तेथे झालेल्या चर्चेवरून पीएसआय शिंदे यांचा संशय बळावला. आरोपी सुरज प्रल्हाद अमझरे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.