शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

आरोग्याच्या उपाययोजना ग्रामसभेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:22 IST

मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात, त्या सोडविण्याच्या दृष्टीने समन्वय साधावा,....

ठळक मुद्देआरोग्य मंत्री : मेळघाट दौऱ्यात अधिकाऱ्याना निर्देश

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात, त्या सोडविण्याच्या दृष्टीने समन्वय साधावा, यामध्ये कुपोषित बालक, मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिले.आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दिल्यात. यावेळी त्यांनी दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा आणि आरोग्यविषयक सेवा जाणून घेण्यासाठी या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य सेवा संचालक सतीश पवार, अतिरिक्त संचालक अर्चना पाटील, उपसंचालक अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले आदी उपस्थित होते.डोमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील भेटीदरम्यान त्यांनी या ठिकाणी होत असलेल्या प्रसुतींची संख्या, बालमृत्यू, कुपोषणाची माहिती जाणून घेतली. या भागात माता-बालमृत्यू होऊ नये, यासाठी प्रभावी उपायायोजना करण्यात याव्यात. माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आशा सेविकांना प्रशिक्षण देण्यात यावे. कमी कालावधीत होणारी प्रसूती सुरक्षितरीत्या होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आशा सेविकांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश ना. दीपक सावंत यांनी दिले.दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी गावातील नागरिक आणि आरोग्य यंत्रणांतील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधावा. यासाठी गावातील अंगणवाडी सेविका, नर्स, आशा सेविका, सरपंच आणि ग्रामस्थांनी एकमेकांशी समन्वय साधावा, असे निर्देशही ना. सावंत यांनी दिले.