शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
6
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
7
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
8
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
9
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
10
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
11
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
12
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
13
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
14
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
15
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
16
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
17
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
18
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
19
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
20
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

ग्रामपंचायत देणार जन्म-मृत्यू, विवाहप्रसंगी रोपट्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 21:53 IST

वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेंट प्रूफव्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देनोंदी घेणार : वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना

आॅनलाईन लोकमतअमरावती : वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेंट प्रूफव्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत बालकांचा जन्म, विवाह, गुणवंत विद्यार्थी, जन्म-मृत्यू व विवाहप्रसंगी रोपटे भेट देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी संबंधितांवर राहील.‘वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत या वर्षात राबण्यिात येणार आहे. याकरिता रोपे उपलब्ध करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. यावर्षी तापमानात मोठी वाढ होणार आहे. त्यांचा परिणाम पर्जन्यमान, उष्णता व आर्द्रतेवर होणार आहे. पृथ्वीतलावरील जीवसृष्टीने त्या वातावरणात तग धरावी, यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याचे आव्हान शासनापुढे आहे. त्या वातावरणीय बदलास पूरक ठरणाºया गावांच्या निर्मितीचा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्यामध्ये गावपातळीवरील लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबविणे, जलसंधारण, डोंगर दत्तक घेणे, नदी दत्तक घेणे, गावतळे, गावाची वनराई, योजनांचा विकास करणे, गावनिहाय सौर ऊर्जा, पवन उर्जा आधारित स्वतंत्र ग्रिड तयार करून ऊर्जा निर्भर गावांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी महत्वाची असलेल्या वृक्षलागवडीची जबाबदारी ग्रामपंचायतींवर देण्यात आली. त्यासाठी येत्या वर्षभरात गावात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक कुटुंबाकडून रोपांची लागवड व्हावी, त्यांचे संगोपन व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीकडून रोपे देण्याची तयारी सुरू आहे.माहेरची झाडे, स्मृती वृक्षही लावणारग्रामपंचायतीला ठरवून दिल्याप्रमाणे गावात नव्याने जन्माला आलेल्या बालकांचे स्वागत फळझाडाच्या रूपात शुभेच्छा देऊन केले जाईल. कुटुंबीयांना बाळाप्रमाणे संवर्धन करण्याची गळ घातली जाईल. गावातील तरुणांच्या विवाहप्रसंगी शुभमंगल वृक्ष, तसेच मुलीच्या विवाहप्रसंगी माहेरची झाडे म्हणून रोपटे दिले जातील. गुणवंत विद्यार्थी, नोकरी मिळालेले, निवडणुकीत विजयी होणाºया उमेदवारांनाही आनंदवन म्हणून रोप दिले जातील. गावात निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी सांत्वन भेटीदरम्यान स्मृतीरोपटे देऊन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.१ जुलैपासून वाटप१ जुलै ते ३० जून या कालावधीतील सर्वच घटना, प्रसंगाची माहिती घेऊन गरजेनुसार रोपे मागवावी, त्या रोपांचे वाटप १ जुलै रोजी एकाच दिवशी केले जाईल. रोप वाटपापूर्वी गावात वृक्षदिंडी काढली जाणार असून, वाटपप्रसंगी रोपांची नोंद ग्रामपंचायत नोंदवहीत घेणार आहे.