शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा धोक्यात, घाटेअळीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: January 29, 2015 22:59 IST

रबी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असणाऱ्या हरभऱ्यावर वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त

अमरावती : रबी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असणाऱ्या हरभऱ्यावर वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबीच्या हरभऱ्यावर होती. मात्र घाटेअळींचा प्रादुर्भावामुळे सरासरी उत्पन्नात कमी येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रबीसाठी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी एक लाख १० हजार ५६९ हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र आहे. रबीच्या एकूण क्षेत्राच्या ७१ टक्के क्षेत्रावर हरभरा आहे. खरिपाच्या हंगामात पावसाच्या १२० दिवसांपैकी केवळ ४३ दिवस पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ८५० ते ९०० मिली सरासरी पाऊस पडायला पाहिजे. परंतु यंदा ५५० मिली पाऊस पडला त्यामुळे रबी हरभराची उगवणशक्ती कमी झाली. मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील हरभराची जमिनीत आर्द्रतेअभावी वाढ खुंटली आहे. खरिपाचा हंगाम लांबणीवर पडल्याने रबीचा हंगाम देखील दीड महिन्यांनी माघारला. काही भागातील हरभरा हा सध्या फुलोऱ्यावर आहे. काही भागात हरभऱ्याला घाटे याययला सुरुवात झाली आहे. जानेवारीच्या प्रारंभापासून वातावरणात बदल, ढगाळ वातावरण, धुके, थंडी तर कधी सूर्यप्रकाश हा वातावरणाचा बदल घाटेअळीला पोषक आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने पहिल्या टप्यात पेरणी झालेल्या हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब न झाल्यास काही दिवसांतच हरभरा पिकात ३० ते ४० टक्क्क््यांनी कमी होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जिल्ह्यात रबीच्या हरभऱ्याची सर्वाधिक २२ हजार ५८२ हेक्टर पेरणी मोर्शी तालुक्यात झाली. दर्यापूर तालुक्यात २० हजार ३२०, धामणगाव तालुक्यात ७६ हजार ८१५ धारणी तालुक्यात ७ हजार ५८० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या पानावर पांढरे ठिपके आढळत असल्यामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. या दिवसांत आठ दिवसांच्या फरकात कीटनाशकांची फवारणी करावी. रबीच्या हरभरा उत्पन्नात सरासरी घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)