शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत मोबाईल मनोऱ्यांवर पडणार गाज

By admin | Updated: January 25, 2015 23:05 IST

महापालिका हद्दीत नियमांना छेद देऊन उभारण्यात आलेले १२८ मोबाईल मनोरे हटविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार रविवारी बडनेऱ्यातील जनक रेसिडेन्सीत उभारण्यात

अमरावती : महापालिका हद्दीत नियमांना छेद देऊन उभारण्यात आलेले १२८ मोबाईल मनोरे हटविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार रविवारी बडनेऱ्यातील जनक रेसिडेन्सीत उभारण्यात आलेला अनधिकृत मोबाईल मनोरा हटविण्याची कारवाई सुरू झाली. मात्र, क्रेन उशिरा पोहचल्याने वेळेअभावी ही कारवाई उद्यावर ढकलण्यात आली. या गंभीर प्रश्नावरुन जनविकास- रिपाइंचे गटनेते प्रकाश बनसोड यांनी आमसभेत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली होती, हे विशेष.न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने ४ मार्च २०१४ रोजी मोबाईल मनोऱ्यांची उभारणी करताना नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमांना अधीन राहूनच मोबाईल मनोऱ्यांची उभारणी करणे अपेक्षित होते. मात्र मोबाईल कंपन्यांनी नियम गुंडाळून मनोरे उभारले आहेत. मनोऱ्यांवर निरंतर कारवाई शहरातील गल्लीबोळात उभारण्यात आलेल्या मनोऱ्यांमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता काही सुजाण लोकप्रतिनिधींनी याविरुद्ध आवाज उठविला. दरम्यान मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ज्या घरांवर मनोरे उभारले आहेत, त्या मालकांनी या लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसे यश मिळाले नाही. अखेर आयुक्त अरुण डोंगरे यांनी अनधिकृत मोबाईल मनोरे काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार सुटीच्या दिवशीही महापालिकेचे अभियंता दीपक खडेकार, मंगेश वाटाणे, हेमंत महाजन, अजय विंचुरकर, शामकांत टोपरे, घनशाम वाघाडे, सुधीर गोटे, योगेश पिठे यांच्या मार्गदर्शनात बडनेऱ्यातील अनधिकृत मोबाईल मनोरा हटविण्यासाठी पोहोचले. मात्र हा मनोरा फार उंच उभारण्यात आला असल्याने कोणताही अपघात किंवा अप्रिय घटना होऊ नये, यासाठी नागपूर येथून मोठी क्रेन मागविण्यात आली आहे. या क्रेनचा दोन दिवसाचा खर्च दोन लाख रुपये असल्याची माहिती उपअभियंता दीपक खडेकार यांनी दिली. शहरात अनिधकृत मोबाईल मनोऱ्यांची समस्या गंभीर असून आयुक्तांच्या आदेशानुसार ते हटविण्याची कारवाई सुरुच राहील, अशी माहिती आहे. नागपूरहून मोबाईल मनोरे हटविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या क्रेनला अमरावतीत पोहोचण्यासाठी १५ तास लागले, हे विशेष! (प्रतिनिधी)