शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा झाल्याचे सांगून हाती दिली मुलगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:49 IST

शस्त्रक्रिया विभागातून मावशी बाहेर आली आणि तिने बाहेर उभे असणाऱ्या महिला रुग्णाच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितले. नातेवाईकांना उत्साह गगनात मावेनासा झाला. मात्र, तासभरात हाती मुलगी दिल्यानंतर संताप अनावर होऊन त्यांनी रुग्णालयात गोंधळ उडाला. मावशीने अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी केलेल्या या कृत्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता.

ठळक मुद्देडफरीनमध्ये गोंधळ : मावशीच्या ‘चहा-पाण्या’च्या खर्चामुळे निर्माण झाला गैरसमज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शस्त्रक्रिया विभागातून मावशी बाहेर आली आणि तिने बाहेर उभे असणाऱ्या महिला रुग्णाच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितले. नातेवाईकांना उत्साह गगनात मावेनासा झाला. मात्र, तासभरात हाती मुलगी दिल्यानंतर संताप अनावर होऊन त्यांनी रुग्णालयात गोंधळ उडाला. मावशीने अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी केलेल्या या कृत्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता.जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका व मदतनीस (मावशी) रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे मागत असल्याचे आरोप अनेकदा नातेवाइकांकडून झाले आहेत. मुलगा किंवा मुलगी जन्माला आले की, रुग्णाचे नातेवाईक बक्षीसस्वरूपात काही ना काही देतात, असा समजच रूढ झाला आहे. मात्र, हा प्रकार अंगलट येऊ शकते, याची प्रचिती सोमवारी डफरीन रुग्णालयात आली. शस्त्रक्रिया विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत एका मावशीने विभागातून बाहेर येऊन रुग्णांच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याची माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात त्यांना मुलगी झाल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत सर्व डफरीन यंत्रणा कामी लागली होती. वरिष्ठ अधिकाºयांसह परिचारिकांना या प्रकाराचा जाब विचारण्यात आला. त्यावेळी मावशीमुळे गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.बाळ जन्माला येताच त्यांना टॅग लावला जातो. त्यावर संबंधित महिलेचे नाव तात्काळ टाकले जाते. बाळ अदलाबदलीचा प्रश्नच उद्भवत नाही. मावशीने बाहेरील रुग्णांच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितल्याने हा गैरसमज झाला. तिला समज देण्यात आली आहे.- अर्चना जामठे, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय.यापूर्वी झाली डीएनए टेस्टकाही वर्षांपूर्वी डफरीन रुग्णालयात असाच प्रकार समोर आला होता. एकाच नावाच्या दोन महिलांची प्रसूती झाली. त्यानंतर मुलगा व मुलगी कोणाची, असा प्रश्न उद्भवला होता. त्यावेळी दोन्ही बाळांची डीएनए टेस्ट करून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले होते.नेमके काय घडले?नांदुरा खुर्द येथील २१ वर्षीय महिलेस सोमवारी सकाळी ६ वाजता व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका २४ वर्षीय महिलेस सकाळी १० वाजता प्रसूतीसाठी दाखल केले. त्यांना सिझरसाठी एकाच वेळी नेण्यात आले. ११.१५ मिनिटांनी नांदुरा खुर्द येथील महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला, तर पाचच मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर येथील महिलेने मुलाला जन्म दिला. यादरम्यान शस्त्रक्रिया विभागातील एक मावशी बाहेर गेली आणि नांदुरा खुर्द येथील महिलेच्या नातेवाइकाला मुलगा झाल्याचे सांगितले. नेमक्या त्याच कुटुंबात मुलगी झाली. तासभरानंतर दोन्ही महिलांच्या हाती बाळ आल्यानंतर नांदुरा खुर्द येथील कुटुंबीयांनी आक्षेप घेतला. मुलगी हाती दिल्याने बाळांच्या अदलाबदलीचा संशय नातेवाइकांना आला होता. डीएनए टेस्ट करू, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगून हा संशय दूर झाला.