शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज मिळवण्यासाठी बायकोशी दगाफटका, दुसरीशी केला घरोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 18:18 IST

Amravati News सहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या बायकोशी गोडीगुलाबीने फारकतनाम्यावर स्वाक्षरी घेऊन दगा दिला नि दुसरीशी विवाह करून संसार थाटल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव येथे घडला.

अमरावती: सहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या बायकोशी गोडीगुलाबीने फारकतनाम्यावर स्वाक्षरी घेऊन दगा दिला नि दुसरीशी विवाह करून संसार थाटल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव येथे घडला. याची तक्रार बायकोने रहिमापूर पोलिसांत दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रकरण दाबल्याचा आरोप या महिलेने केला आहे.पोलीस सूत्रांनुसार, रूपाली हिचा विवाह सन २०१० मध्ये गावंडगाव येथील अमोल याच्याशी झाला. त्यांना ९ वर्षांची एक मुलगीदेखील आहे. त्यांचा संसार सुरळीत सुरू असताना अमोलला कृषिसेवा केंद्राच्या व्यवसायाकरिता लोन हवे होते. त्यासाठी फारकतनाम्यावर लोन घेतल्यास सबसिडी मिळत असल्याची बतावणी त्याने पत्नीला केली.

अमोल हा पत्नीसोबत चांगलाच वागत असल्याने तिने संसाराच्या फायद्यासाठी फारकतनाम्यासाठी होकार दिला. अमोलने तिला वकिलाकडे नेऊन फारकनाम्यावर स्वाक्षरी करवून घेतली. नंतर दुसऱ्या मुलीशी लग्न करून घरात आणले. तेव्हा माझी फसवणूक का केली, असे विचारले असता, आता तू सर्व लिहून दिले आहे. त्यामुळे कुठेही गेली तरी माझे काहीच होणार नाही, असे त्याने रूपालीला सांगितले. त्यामुळे ती माहेरी रहायला आली. तिने रहिमापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्याय मिळण्यासाठी तक्रार दिली असता, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रकरण रफादफा केल्याचा तिचा आरोप आहे. एवढी मोठी फसवणूक होऊन संसार मोडला असतानाही व्यवस्था न्याय देत नसल्याने ती उपोषणालाही बसली. तिचे प्रकरण न्यायालयात देऊन न्यायव्यवस्थेकडून यावर निर्णय व्हावा, अशी तिची अपेक्षा आहे.अर्जदाराने पाच लाखांपैकी एक रुपयाही मिळाला नसल्याचे सांगितले असले तरी कायदेशीर फारकतनमा झालेला आहे. तिला दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणामध्ये आम्ही काही करू शकत नाही- सचिन इंगळे, ठाणेदार, रहिमापूर

टॅग्स :fraudधोकेबाजी