शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

उत्पन्न १० लाख; खर्च ६० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:25 IST

महापालिकेचा दररोजचा खर्च ६० ते ७० लाख आणि उत्पन्न ८ ते १० लाख, अशी दयनीय अवस्था सध्या निर्माण झाली आहे. विकासकामांची बिले, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थांबविले आहे.

ठळक मुद्देमहापालिका : अर्थव्यवस्थेचा पाय खोलात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेचा दररोजचा खर्च ६० ते ७० लाख आणि उत्पन्न ८ ते १० लाख, अशी दयनीय अवस्था सध्या निर्माण झाली आहे. विकासकामांची बिले, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थांबविले आहे. दरमहिन्याला जीएसटीच्या मोबदल्यापोटी शासनाकडून येणाऱ्या ९.२२ कोटींच्या निधीतून विकासकामे करावीत, कर्मचाऱ्यांचा पगार करायचा की अत्यावश्यक खर्च भागवायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. मालमत्ता कराची एकूण मागणी अद्याप ठरली नसली तरी एप्रिल ते आॅगस्टदरम्यान महापालिकेच्या तिजोरीत केवळ ३ कोटी रुपये आल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे दैनंदिन खर्चासह आस्थापना खर्चात काटकसरीच्या भूमिकेपर्यंत प्रशासन पोहोचले आहे.महापालिका आयुक्तांना कार्यभार स्वीकारून अडीच माहिने झाले. मात्र, त्यांनाही अद्याप सूर गवसलेला नाही. खर्च अवाढव्य आणि वसुली तळाला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालमत्ता कर, नगररचना, अग्निशमन विभाग, बाजार परवराना कडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती चक्क व्हेंटिलेटरवर आली आहे. दररोज केवळ आठ ते दहा लाख रुपये तिजोरीत येत आहेत. तिजोरीत पैसेच येत नसल्याने मागील तीन महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाहीत. कंत्राटी कर्मचारी सध्या बंडाचा झेंडा रोवण्याच्या प्रयत्नात आहेत. खिशातील पैसे खर्च करून ज्या कंत्राटदारांनी विकासकामे केली त्यांचीही बिले वर्षभरापासून थांबवून ठेवण्यात आली आहेत. सध्या नवीन कामे घेण्यास कंत्राटदार तयार नाहीत. त्यामुळे नगरसेवक, पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेचा वार्षिक खर्च २२५ कोटींच्या घरात आहे. त्यात कर्मचाºयांचे वेतन, सेवानिवृती वेतन, इंधन खर्च अशा बांधील खर्चाचा समावेश आहे. हा खर्च करावाच लागतो, त्यास अन्य पर्याय नाही. मात्र मालमत्ता कराची वसुली शतप्रतिशत होत नसल्याने त्या खर्चाला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे नझूल व एडीटीपीमधून येणारा निधी वळवून जमाखर्चाची तोंडमिळवणी केली जात आहे. मालमत्ता कर, बाजारपरवाना विभागातील कर, जाहिरातीतून येणाºया कररुपी महसुलावर महापालिकेची आर्थिक मदार आहे. त्यातून वर्षाकाठी अधिकाधिक ४० ते ४५ कोटी रुपये महसूल येतो. याशिवाय जीएसटीचे सरासरी १०० कोटी वार्षिक रक्कमेचा समावेश केल्यास एकूण उत्पन्न १५० कोटींवर पोहचते. तरीही २२५ कोटींच्या एकूण खर्चाच्या तुलनेत ७५ कोटीं कमी पडतात. त्यामुळे आठ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधीत्व करणारी महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे.महापालिकेवर ३१९ कोेटींचे दायित्वमहापालिकेवर एकूण ३१९ कोटींचे दायित्व आहेत. यात कंत्राटदारांचे ८० कोटी, पाणीपुरवठ्याचे ४९.८८ कोटी, नगरोत्थानचे ३०.४८ कोटी, नागरी स्वच्छतेचे ७.५० कोटीचा समावेश आहे. या कर्जामुळे महापालिकेचा पाय आणखी खोलात शिरला आहे.खर्च ६० लाख व वसुली १० लाखांची ही महापालिकेची वस्तुस्थिती आहे. शिवाय ३१९ कोटींचे दायित्व असल्याने आर्थिक कसरत सुरू आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर देण्याची निकड आहे.- प्रेमदास राठोड, मुख्यलेखाधिकारी